Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भारतीय संस्कृतीविरोधी सनबर्न फेस्टिव्हल गावात होऊ देणार नाही !

केसनंद येथील ग्रामस्थांचा निर्धार ! 

सनबर्नच्या विरोधात पार पडलेल्या बैठकीतील ग्रामस्थ

       पुणे, १९ डिसेंबर (वार्ता.) - पोलिसांची, तसेच शासकीय आणि प्रशासकीय अनुमती नसतांना सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांनी २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत केसनंद येथे होणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलची जय्यत सिद्धता चालू केली आहे. या फेस्टिव्हलसाठी बिनदिक्कतपणे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत असून डोंगराचे सपाटीकरण चालू आहे. अनेक शेतकरीही बाधित झाले आहेत. याशिवाय भारतीय संस्कृतीशी नाळ तोडून तरुणांना व्यसनाधीन बनवण्याच्या संदर्भातही हा फेस्टिव्हल कुप्रसिद्ध आहे. त्यामुळेच भारतीय संस्कृतीविरोधी सनबर्न फेस्टिव्हल गावात कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका केसनंद ग्रामस्थांनी घेतली आहे.
       या कार्यक्रमाच्या विरोधात केसनंद गावामध्ये ग्रामस्थांच्या दोन बैठका आतापर्यंत पार पडल्या. या बैठकांच्या वेळी या कार्यक्रमाला तीव्र विरोध करण्याचे उत्स्फूर्तपणे ठरवण्यात आले. १८ डिसेंबर या दिवशी झालेल्या बैठकीच्या वेळी एकूण ५२ धर्माभिमानी उपस्थित होते. या बैठकीमध्ये २१ डिसेंबरला विशेष ग्रामसभा घेऊन सनबर्नच्या विरोधात ठराव करण्याचे ठरवण्यात आले, तसेच जनजागृती करण्यासाठी पंचक्रोशीत बॅनर लावण्याचे, तसेच स्वाक्षरी मोहीम घेण्याचेही निश्‍चित करण्यात आले. या वेळी उपसरपंच श्री. हिरामण हरगुडेे, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री प्रमोद हरगुडे, रमेश हरगुडे, शिवाजी हरगुडे, फुरसुंगी येथील नंदू काका रहाणे, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले, दीपक आगवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn