Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संस्कृत भाषेचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व आधुनिक वैज्ञानिक संशोधनाद्वारे सिद्ध करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेला शोधनिबंध सादर !

शोधनिबंध सादर करतांना सौ. क्षिप्रा जुवेकर
देहलीतील जेएन्यू विश्‍वविद्यालयातील आंतरराष्ट्रीय वेद परिषदेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा सहभाग
      नवी देहली - येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये (जेएन्यूमध्ये) १५ ते १८ डिसेंबर या कालावधीत वेद अ‍ॅज ग्लोबल हेरिटेज : सायंटिफिक पर्सपेक्टीव्ह (वेद एक वैश्‍विक वारसा : वैज्ञानिक दृष्टीकोन) या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात ८५ शोधनिबंध सादर करण्यात आले. ७ विदेशी संशोधकांसह, वैज्ञानिक आणि विद्वान यांनी यात सहभाग घेतला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा सटल इफेक्ट ऑफ संस्कृत टेक्स्ट अ‍ॅण्ड स्क्रिप्ट कम्पेर्ड टू अदर लँग्वेजेस (संस्कृत भाषा आणि (देवनागरी) लिपी यांचा अन्य भाषांच्या तुलनेत सूक्ष्मस्तरावर होणारा परिणाम) हा शोधनिबंध सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी उपस्थितांसमोर मांडला. या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. प्रणव मणेरीकर हेही उपस्थित होते.
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला मिळालेले प्रमाणपत्र
संस्कृत भाषेमध्ये अन्य भाषांच्या तुलनेत सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने आहेत. त्यामुळे ही भाषा वापरणार्‍यांना आध्यात्मिक स्तरावरही लाभ मिळतो. यासाठी वेद, पुराण, उपनिषद आदी प्राचीन हिंदु ग्रंथांच्या रचनेसाठी ऋषिमुनींनी संस्कृत भाषेचाच वापर केला. संस्कृत भाषेतील लिखाणाचे अन्य भाषांत भाषांतर होते, तेव्हा भाषांतरित लिखाणात मूळ संस्कृतएवढी सकारात्मक स्पंदने नसतात, हे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेल्या विविध वैज्ञानिक चाचण्यांमध्ये दिसून आले.
     श्रीमद्भगवद्गीतेतील मूळ संस्कृत श्‍लोक आणि त्याचे इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांतील भाषांतर यांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम स्पष्ट करणारे पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (ऑराचा) अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले संशोधन या शोधनिबंधात दिले आहे, तसेच याविषयी स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी काढलेल्या सूक्ष्म-चित्रांद्वारेही शोधनिबंधातील विषय स्पष्ट केला आहे.
     भाषा जेवढी सात्त्विक असते, तेवढी तिच्यात सकारात्मक स्पंदने अधिक प्रमाणात असतात आणि त्याचा लाभ भाषेचा वापर करणार्‍यांना होतो. सात्त्विकतेच्या दृष्टीने क्रमवारी करायची झाल्यास प्रथम संस्कृत त्यानंतर अनुक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा येतो, असे या संशोधनात आढळले.
     संस्कृत अध्ययन केंद्राचे अध्यक्ष प्रा. गिरीषनाथ झा हे परिषदेचे मुख्य मार्गदर्शक होते. परिषदेच्या अंतिम सत्रामध्ये अमेरिकेतून आलेले संप्रज्ञ संस्थेचे सांख्यिकी विश्‍लेषक श्री. क्रिस्टोफर शॅनन यांनी सांगितले, वेद आपल्या आईप्रमाणे आहेत आणि ते आम्हाला आमच्या पित्याविषयी म्हणजेच परमेश्‍वराविषयी सांगत आहेत. वेदांमुळेच आम्ही परमेश्‍वराला ओळखू शकतो. विकासाच्या तुलनेत आनंदाचे प्रमाण अल्प होत गेले आहे. वेदांच्या अभ्यासाने आपण आनंद मिळवू शकतो. यावर संयुक्त राष्ट्रांकडून अभ्यास करण्यात येत आहे.
क्षणचित्रे
१. डॉ. मंगलागौरी राव यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शोधप्रबंधाचे कौतुक करतांना अत्यंत सुंदर अशा शब्दात अभिप्राय दिला, तसेच इंदूर येथील डॉ. सी.पी. त्रिवेदी यांनीही शोधनिबंधाचे कौतुक केले.
२. दोन संशोधकांनी सांगितले की, हाच विषय समाजासाठी आवश्यक आहे. आम्ही एकाग्रतेने विषय ऐकत होतो आणि आपली संस्कृती किती महान आहे, याची आम्हाला जाणीव झाली.
३. परिषदेच्या आयोजकांपैकी एक असणार्‍या डॉ. मोनिका राठोड यांनी परिषदेत सहभागी होण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला साहाय्य केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn