Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

समंजस, लाघवी आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील कु. कृष्णा संदीप चौधरी (वय ९ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र
चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. कृष्णा संदीप चौधरी एक दैवी बालक आहे !
कु. कृष्णा चौधरी
     मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वितीया (१.१२.२०१६) या दिवशी कु. कृष्णा संदीप चौधरी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
                                    पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
      तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर यूट्यूबच्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
कु. कृष्णा संदीप चौधरी याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. जन्मानंतर घराजवळ वड, औदुंबर, अश्‍वत्थ (पिंपळ) हे 
दैवी वृक्ष उगवणेे आणि औदुंबराच्या वृक्षावर स्वस्तिक उमटणे
    कृष्णाच्या जन्मानंतर ८ दिवसांतच घराच्या पूर्व दिशेला वड, औदुंबर, अश्‍वत्थ (पिंपळ) हे ३ वृक्ष एका रांगेत १०-१० फुटांच्या अंतरावर उगवले आणि एका वर्षातच सरळ उंच वाढून घराच्याही वर वाढले. आता औदुंबराच्या वृक्षावर स्वस्तिक उमटले आहे. कृष्णाला झाडे लावण्याची आवड आहे.
२. निर्मळ
     कृष्णाने खोड्या केल्यावर त्याला रागावले, तरी तो लगेच बोलायला येतो. तो मनात राग ठेवत नाही.
३. समंजस 
अ. आमच्या घरचा दूरदर्शन संच बंद आहे. शेजारची मुले दूरदर्शन पहातात, तरीही तो मला दूरदर्शन चालू करण्याविषयी कधीही सांगत नाही.
आ. कृष्णा प्रेमळ असल्यामुळे त्याच्या सहवासात लहान मुलांना चांगले वाटते. गुरुपौर्णिमा आणि अन्य कार्यक्रमांच्या वेळी सर्व लहान मुले कृष्णाशी खेळायचे आहे, असे म्हणतात. त्या वेळी मुलांच्या पालकांना त्रास होऊ नये; म्हणून इच्छा नसतांनाही कृष्णा लहान मुलांशी खेळतो. 
इ. कृष्णा माझ्यासमवेत रामनाथी येथे एका शिबिरासाठी आला. त्याच कालावधीत कृष्णाची शेगांव (आनंदसागर) येथे निवासी सहल जाणार होती. ही सहल तो तिसरीत असल्यापासूनच (आता तो ४ थीत शिकत आहे.) ठरली होती; पण आश्रमात गेल्यामुळे काय लाभ होणार ?, हे सांगितल्यावर तो आश्रमात येण्यासाठी लगेच सिद्ध झाला. तो तेथे आनंदी होता.
४. सहनशील 
अ. कृष्णाला ताप आल्यावरही तो शांतपणे झोपून रहातो. तो काहीही मागत नाही किंवा रडतही नाही.
आ. मे २०१६ मध्ये कृष्णाला बसायच्या जागेवर मोठे फोड आले. ते बरे झाल्यावर पुन्हा ऑगस्टमध्ये त्याला त्याच ठिकाणी मोठा फोड झाला. अशा स्थितीत तो सकाळी सहा वाजता आवरून हिंदूसंघटन मेळाव्यासाठी माझ्यासमवेत आला. तेव्हा तो शांत आणि स्थिर होता. नंतर त्याला ताप आला. दुसर्‍या दिवशी आधुनिक वैद्यांकडे नेल्यावर त्यांनी लगेच शस्त्रकर्म करून फोडातील पू काढला.
५. लाघवी
    कृष्णा शाळेतील सर्व शिक्षक आणि मुले यांचा आवडता आहे. त्याचे वर्गशिक्षक म्हणतात, त्याला हाक मारतांना आमचा कृष्णा, कृष्णा, असा नामजप होतो.
६. देवाची ओढ 
अ. कृष्णा ६ - ७ मासांचा (महिन्यांचा) असतांना भजने लावल्यावर शांतपणे ऐकत असे.
आ. कृष्णा देवपूजा भावपूर्ण करतो. तो एकेक देवता ताम्हनात ठेेवून त्या देवतेचा नामजप करत देवतेला स्नान घालतो. 
इ. तो आरती लयीत म्हणतो. त्याला देवळात जायला आवडते. तो प्रतिदिन सायंकाळी शुभंकरोती, रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणतो.
ई. कृष्णा उपायांची चित्रे स्वतःच भारित करतो आणि मला तुलाही करून देऊ का ?, असे विचारतो. 
७. कृष्णाला रामायण, महाभारत आणि छत्रपति शिवाजी महाराज यांच्या गोष्टी ऐकायला आवडतात.
८. प.पू. गुरुदेवांप्रती भाव
अ. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे आणि आध्यात्मिक उपाय केल्यामुळेे अल्प काळ अभ्यास करूनही अन्य मुलांपेक्षा चांगले गुण मिळतात, अशी त्याची दृढ श्रद्धा आहे. 
आ. प.पू. गुरुदेवच आपत्काळात आपले रक्षण करणार आहेत, असा त्याचा भाव आहे. 
- सौ. सौख्या संदीप चौधरी (कृष्णाची आई), जळगाव (२२.९.२०१६)-
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn