Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोल्हापुरातील हे राम नथुराम नाटकाचा प्रयोग प्रचंड उत्साहात यशस्वी !

हिंदुत्वनिष्ठांच्या कणखर भूमिकेचा परिणाम केशवराव नाट्यगृहास पोलीस छावणीचे स्वरूप !
आंदोलन करणारे ४० हून अधिक कार्यकर्ते पोलिसांच्या कह्यात !
    
नाटक पार पडल्यावर श्री. शरद पोंक्षे (१) यांच्याशी चर्चा
करतांना शिवसेनेचे श्री. संजय पवार (२) आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ
     कोल्हापूर, २० डिसेंबर (वार्ता.) - हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे दिग्दर्शित हे राम नथुरामच्या प्रयोगाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमान संघटना, नौजवान सभा यांसह विविध पुरो(अधो)गामी संघटनांनी विरोध केला. नाटक होऊ न देण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांवर दबाव आणला, नाटक उधळून लावण्याची चेतावणी दिली; मात्र इतके सगळे होऊनही शिवसेना आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे १९ डिसेंबर या दिवशी केशवराव भोसले नाट्यगृहात नाट्यरसिकांच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहात नाटकाचा प्रयोग यशस्वी झाला. एकूण परिस्थिती पहाता नाट्यगृहाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नाटक चालू होण्यापूर्वी निदर्शने करणार्‍या विविध पुरोगामी संघटना आणि पक्ष यांच्या ४० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेऊन सोडून दिले.
१. १९ डिसेंबरला नाटक आहे, असे समजल्यापासून नाटकाला विरोध चालू झाला. १७ डिसेंबर या दिवशी विविध पुरोगामी संघटनांकडून महापालिका आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

२. १९ डिसेंबर या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन करून प्रयोगास अनुमती न देण्यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव आणला. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी नाट्यगृहाची मोडतोड झाल्यास नाट्यगृहाची हानी होईल म्हणून शरद पोंक्षे आणि निर्माते धुरत यांना हमी म्हणून १० लक्ष रुपये भरण्यास सांगितले. तडजोड होऊन पोंक्षे यांनी ५ लक्ष रुपयांचा धनादेश महापालिकेला सुपुर्द केला आणि प्रयोगास अनुमती देण्यात आली.
३. श्री. पोंक्षे महापालिकेत आले असता पुरोगामी संघटनांनी त्यांना पाहून घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी पोलीस बंदोबस्तात त्यांना बाहेर काढले.
४. नाटक चालू होण्याच्या अगोदर पुरोगामी संघटनांच्या ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या वेळी तेथे उपस्थित असणार्‍या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तात्काळ कह्यात घेऊन दुसरीकडे नेले.
५. नाटक चालू होण्यापूर्वी शिवसेना, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, विहिंप, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने नाट्यगृहात येत होते. पोलीस प्रत्येकाची तपासणी करूनच सोडत होते. अनुचित प्रकार न होण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
६. अखेर नाट्यरसिकांच्या प्रचंड उत्साहात नाटक चालू होऊन ते योग्य प्रकारे पार पडले.
७. हे नाटक पार पाडण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी मोलाची भूमिका बजावली. नाटकाच्या समर्थनार्थ शिवसैनिकांचे संघटन उभे करून नाटकाला विरोध झाल्यास तो मोडून काढण्यापर्यंतची सर्व सिद्धता त्यांनी केली होती.
नाटकाच्या कालावधीत भारतमाता की जय आणि वन्दे मातरम्चा जयघोष !
नाटक चालू झाल्यावर पडदा उघडल्यापासून ते नाटक संपेपर्यंत नाट्यरसिकांनी अधूनमधून भारतमाता की जय आणि वन्दे मातरम्चा जयघोष करून नाट्यगृह दणाणून सोडले. श्री. शरद पोंक्षे यांच्या उत्कृष्ट सादरीकरणात अनेक प्रसंगांत टाळ्यांचा कडकडाट सभागृहात होत होता. श्री. शरद पोंक्षे यांच्या जिवंत अभिनयामुळे प्रेक्षक राष्ट्रभक्तीच्या धारेत शेवटपर्यंत न्हाऊन निघाले.
पोलीस, शिवसेना आणि महापालिका आयुक्त यांचे आभार ! - श्री. शरद पोंक्षे
      आज हे नाटक शिवसेना, तसेच माझ्यावर प्रेम करणार्‍या कोल्हापूरकर यांच्यामुळे यशस्वी होऊ शकले. हे नाटक होण्यासाठी राजवाडा पोलीस, तसेच महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचेही मी आभार मानतो, असे श्री. पोंक्षे यांनी प्रयोगाच्या कालावधीत सांगितले.
हिंदु जनजागृती समितीचा श्री. शरद पोंक्षे यांना पाठिंबा !
      या सर्व प्रक्रियेत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते दुपारपासून श्री. पोंक्षे यांच्या समवेत होते. दुपारी समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री. पोंक्षे यांची भेट घेऊन आम्ही तुमच्या समवेत आहोत, असे सांगून प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग संपेपर्यंत समितीचे कार्यकर्ते सभागृहात उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn