Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

श्री. अशोक रेणके यांना सनातन संस्थेत येण्यापूर्वी, संस्थेत आल्यानंतर आणि प.पू. डॉक्टरांची भेट झाल्यावर आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
१. एका संप्रदायातील महाराजांना शिष्य करून घेण्यास आणि दीक्षा देण्यास सांगितल्यावर त्यांनी ‘योग्य वेळ येताच गुरु भेटतील’, असे सांगणे अन् कालांतराने सनातन संस्थेशी जोडल्यानंतर त्याविषयी उलगडा होणे : ‘प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मी वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेशी जोडले गेलो, हे माझे परम भाग्य आहे. जगात अध्यात्म शिकवणार्‍या अनेक संस्था आहेत; परंतु सनातन संस्थेसारखी संस्था विरळच ! सनातन संस्थेशी जोडण्यापूर्वी मी वेगवेगळ्या संप्रदायांप्रमाणे साधना करत होतो. वर्ष १९९६ मध्ये बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे श्रावण मासानिमित्त प्रत्येक दिवशी एका संप्रदायाच्या महाराजांच्या प्रवचनाला मी जात असे. त्या वेळी मला वाटले, ‘हे अध्यात्मातील
श्री. अशोक रेणके
एक अधिकारी संत आहेत. आपण यांना भेटून पुढील मार्गदर्शन घेऊया आणि साधना चालू ठेवूया.’ त्यानंतर मी एके दिवशी त्या महाराजांना म्हणालो, ‘‘महाराज, मला तुमचा शिष्य करून घ्या. मला दीक्षा द्या.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्हाला थोडे दिवस वाट पहावी लागेल. योग्य वेळ येताच तुम्हाला तुमचे गुरु भेटतील. तोपर्यंत तुम्ही नामजप करत रहा.’’ कालांतराने मी सनातन संस्थेशी जोडल्यानंतर मला अध्यात्माचे धडे मिळाले. ‘साधना म्हणजे काय ? ती आपण आपल्या जीवनात कसे आत्मसात करू शकतो ? गुरु करायचे असतात का ? जीवनात गुरु कसे येतात ?’ इत्यादी सर्व शिकायला मिळाले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी महाराजांना ‘दीक्षा द्या, शिष्य करून घ्या’ इत्यादी जे म्हणालो, ते स्वतः ठरवायचे नसते. स्वतःहून कुणाला गुरु करायचे नसते. आपल्या जीवनात गुरु स्वत:च येतात.’
२. सनातनचे ग्रंथ वाचल्याने साधनेची दिशा मिळणे, सत्संगात गेल्याने शंकानिरसन होणे आणि त्यानंतर प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभेनिमित्त आलेल्या साधकांची निवास अन् भोजन व्यवस्था करण्याची सेवा मिळणे : वर्ष १९९७ मध्ये गडहिंग्लज येथील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लागले होते. मी ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ हा ग्रंथ वाचला आणि अभ्यास केला. त्यामुळे मला साधनेची दिशा मिळाली. अधूनमधून सत्संगात गेल्याने माझ्या मनातील शंकांचे निरसन झाले. त्यानंतर २.२.१९९८ या दिवशी गडहिंग्लज येथे सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांची मोठी जाहीर सभा झाली. त्या वेळी प्रसारासाठी आणि पूर्वसिद्धता करण्यासाठी बाहेरगावाहून साधारण १०० ते १५० साधक सेवेसाठी आले होते. त्या सर्व साधकांची भोजनव्यवस्था आमच्या घरी करण्यात आली. 
३. सेवेमुळे प.पू. डॉक्टरांच्या दर्शनाला जाता न येणे आणि जाहीर सभा झाल्यानंतर प.पू. डॉक्टरांनी भेटण्यासाठी बोलावून घेणे : सर्व साधकांचे रहाण्याचे आणि जेवणाचे नियोजन यांमुळे मला सभेला आणि प.पू. गुरुदेवांच्या (प.पू. डॉक्टरांच्या) दर्शनाला जाता आले नाही. सर्व साधक जेवण करून प.पू. डॉक्टरांच्या दर्शनाला आणि गटचर्चेला गिजवणे येथे गेले. सभा झाल्यानंतर प.पू. डॉक्टरांनी सर्व साधकांशी चर्चा करतांना विचारले, ‘‘येथे सभेच्या सिद्धतेसाठीचे साधक कुठे थांबले आहेत ? सर्वांची भोजनव्यवस्था कुठे केली आहे ?’’ त्यानंतर मला निरोप मिळाला, ‘‘तुम्ही लगेच प.पू. डॉक्टरांच्या दर्शनाला या.’’ त्यानुसार मी त्या स्थळी पोेचलो. ‘मी त्यांच्याजवळ कसा पोेचलो’, हे मला ठाऊक नाही. 
४. प.पू. डॉक्टरांच्या जवळ गेल्याक्षणी मला आध्यात्मिक त्रास चालू झाला. मी प.पू. डॉक्टरांच्या चरणांवर लोटांगण घालून गडबडा लोळत होतो. ‘अकस्मात् काय झाले ?’, ते मला समजले नाही. त्या वेळी मी शुद्धीवर नव्हतो. माझे माझ्या शरिरावर नियंत्रण नव्हते. काही साधक मला उठवायचा प्रयत्न करत होते. मला पुष्कळ त्रास झाला. थोड्याच वेळाने मला उचलून दुसरीकडे बसवले; कारण माझ्या शरिरात शक्ती नव्हती. मी संपूर्णपणे गळून गेलो होतो. मला बसता येत नव्हते कि उठता येत नव्हते. 
     माझी ही स्थिती पाहून माझी पत्नी सौ. सुजाता हिला काळजी वाटली. तिने दुसर्‍या दिवशी सकाळी प.पू. डॉक्टरांना भेटून मला झालेल्या त्रासांविषयी जाणून घेतले. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘काही काळजी करू नका. सर्व ठीक होईल.’’ नंतर त्यांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ९ माळा नियमित करायला सांगितला. त्यानुसार मी वर्षभर ९ माळा नामजप करत होतो. त्यानंतर माझ्या आध्यात्मिक त्रासांची तीव्रता उणावली. 
      श्रीकृष्णाच्या कृपेने प्रथम भेटीतच प.पू. गुरुदेवांनी माझा उद्धार केला; म्हणूनच मी आज जिवंत आहे आणि साधनेत टिकून आहे. याविषयी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’ 
- श्री. अशोक लक्ष्मण रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.८.२०१६) 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn