Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

क्रूर आणि आदर्श प्रथा !

संपादकीय
     ‘तोंडी तलाक घटनाबाह्य आणि मुसलमान महिलांवर अन्याय करणारी क्रूर प्रथा आहे’, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवार, ८ डिसेंबरला दिला. साहजिकच या निर्णयावर अबू आझमी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांसारख्या धर्मांधांची नाराजी असणारच ! हे धर्मांध काही दिवसांपासून तोंडी तलाकची मखलाशी करतांना ‘भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे’, असेही सांगत होते. म्हणजे यांना भारतातील बहुसंख्य हिंदूंची जी संस्कृती आहे, ती पुरुषप्रधान आहे, असे सांगायचे होते आणि त्याचा लाभ उठवायचा होता. या देशातील पुरो(अधो)गामी, तथाकथित स्त्रीस्वातंत्र्यवाले जे बरळतात तेच हे बरळत होते. यांना हिंदु संस्कृतीचे महत्त्व कधीच लक्षात आले नाही. त्यामुळे हिंदु संस्कृतीतील आदर्श प्रथा आणि अन्य क्रूर प्रथा यांतील भेद समजून घेणे आवश्यक आहे.
हिंदु संस्कृतीत स्त्रिया आधीपासूनच मुक्त !
     हिंदु संस्कृतीने स्त्रीला कधीच बंधनात ठेवले नाही. त्यामुळे वेद जाणणार्‍या गार्गी, मैत्रेयी यांपासून लढवय्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहल्याबाई होळकर, राणी चेन्नम्मा, जिजाबाई आदी स्त्रियांपर्यंतचा इतिहास हिंदु धर्माला आहे. जरी ब्रिटिशांच्या काळात काही समाजसेवी स्त्रियांनी मुलींच्या शाळा चालू केल्या, स्त्रियांना शिक्षण दिले वगैरे डांगोरा पिटला जात असला, तरी त्यापूर्वीही स्त्रिया पुरुषांएवढ्याच शिक्षित होत्या, हे ऐतिहासिक सत्य नाकारता येणार नाही. हिंदूंच्या स्त्रियांवर बंधने आली, ती या देशात मोगलांची एकापाठोपाठ एक आक्रमणे चालू झाली आणि त्यांची वासनांध नजर हिंदूंच्या मुक्त स्त्रियांवर पडू लागली तेव्हा ! त्यामुळेच राणी पद्मिनीसारख्या असंख्य रजपूत स्त्रियांना जोहार (अग्निसमर्पण) करावा लागला. हिंदूंच्या स्त्रियांकडे वाईट नजरेने पहाणार्‍या धर्मांधांनी त्यांच्या स्त्रियांना मात्र बुरख्यात बंदिस्त ठेवले; कारण आपल्याप्रमाणेच इतर पुरुषही वासनांध असतील, अशी त्यांना भीती असावी. 
अबू आझमी यांचे चिथावणीखोर विधान !
     अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही धर्मांध अबू आझमी ‘समजा हिंदूंना सांगितले की, त्यांना मृत्यूनंतर जाळायचे नाही किंवा त्यांच्या अन्य धर्मपरंपरांचे पालन करायचे नाही, तर त्यांना कसे वाटेल ? तसेच तलाकच्या संदर्भात आहे’, असे बरळले. मुसलमान महिलांना एका मिनिटात अनाथ करणार्‍या, त्यांच्यावर प्रचंड मानसिक आघात करणार्‍या तोंडी तलाकची तुलना हिंदूंच्या चैतन्यदायी धर्मपरंपरांशी करून अबू आझमी यांनी त्यांची मनोवृत्ती दाखवून दिली आहे. तसेच त्वरित हिंदु धर्मातील परंपरांवर बोलून ते या देशात अल्पसंख्यांकांच्या धार्मिक भावनांना किंमत दिली जात नाही, असे भासवून भावनिक स्तरावर धर्मांधांना चिथावण्याचा प्रयत्न करत आहेत. 
हिंदूंच्या धर्मपरंपरा शास्त्रशुद्ध !
     हिंदूंच्या प्रथा या भाविकांचे आध्यात्मिक हित पहाणार्‍या आहेत आणि त्याचबरोबर मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्याही त्या ‘क्रूर’ नाहीत. हिंदु धर्मातील मृत्यूनंतर दहन करणे असो किंवा अन्य कोणतीही परंपरा असो, आपल्या ऋषिमुनींनी पुरेपूर अभ्यासांती ठरवलेल्या आणि आध्यात्मिक निकषांत बसणार्‍या या परिपूर्ण शास्त्रोक्त परंपरा आहेत. तृप्ती देसाई यांच्यासारखे स्त्रीमुक्तीवाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले यांना मात्र त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी हे जाणून घ्यायची इच्छा होत नाही. त्यामुळेच शनिशिंगणापूर येथे स्त्रियांनी शनीच्या चौथर्‍यावर न जाण्याच्या प्रथेमागील अध्यात्मशास्त्रीय कारण जाणून न घेताच स्त्रियांना समान अधिकार देण्याच्या नावाखाली प्रथा घटनाबाह्य पद्धतीने बलपूर्वक मोडीत काढण्यात आली. तरीही अनेक श्रद्धाळू स्त्रिया अजूनही शनीच्या चौथर्‍यावर जात नाहीत आणि हा तृप्ती देसाई, अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांच्यासारख्या स्त्रीमुक्तीवाल्यांचा पराभवच आहे. बहुतांश हिंदूही प्रथापरंपरांमागील धर्मशास्त्राविषयी अनभिज्ञ आहेत; परंतु हा हिंदु धर्माचा नाही, तर धर्मशिक्षण नसलेल्या हिंदूंचा दोष आहे.
केरळ उच्च न्यायालयाचा स्तुत्य निवाडा !
    ८ डिसेंबरलाच आणखी एक निवाडा झाला आणि तो होता केरळ उच्च न्यायालयाचा ! केरळमधील थिरुवनंतपुरम् पद्मनाभस्वामी मंदिरात महिला भाविकांना सलवार कमिज आणि चुडीदार घालण्यास तेथील मंदिराच्या कार्यकारी अधिकार्‍यांनी अनुमती दिली होती. मंदिराच्या कार्यकारी अधिकार्‍यांच्या या निर्णयास स्थगिती देतांना केरळ उच्च न्यायालयाने ‘मंदिरातील परंपरा आणि विधी यांविषयी पुजार्‍यांचे मत अंतिम असेल’, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. यावरूनही हिंदूंच्या प्रथापरंपरा अबाधित ठेवल्या जातात आणि धर्मांधांच्या प्रथा या देशात घटनाबाह्य ठरवल्या जातात, असा कांगावा अबू आझमी यांच्यासारख्या धर्मांध नेत्यांच्या समवेत तथाकथित धर्मनिरपेक्ष करण्यास मागे रहाणार नाहीत. याकडे दुर्लक्ष करत आणि केरळ उच्च न्यायालयाच्या स्तुत्य निर्णयाचा आधार घेत सर्वच मंदिरांतील पुजार्‍यांनी मंदिरात प्रवेश करतांना कोणता पोशाख असावा, याविषयी आचारसंहिता लागू करावी !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn