Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन !

    सातारा, ३ डिसेंबर (वार्ता.) - येथील शहर पोलीस ठाण्यात प्रविष्ट असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना तात्पुरत्या स्वरूपाचा अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने दिला आहे.
१. पीडित महिला व्यक्तीमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देणार्‍या एका संस्थेत प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. गोरे यांनी पीडित महिलेशी ओळख करून घेतली. तिचा भ्रमणभाष क्रमांक घेऊन व्हॉट्स अ‍ॅपवर अश्‍लील संदेश, छायाचित्रे आणि चलचित्रे पाठवली.
२. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून २५ नोव्हेंबर या दिवशी शहर पोलीस ठाण्यात काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. आमदार गोरे यांच्या शोधार्थ दोन पोलीस पथके पाठवण्यात आली; मात्र त्यांना आमदार गोरे यांचा सुगावा लागला नाही.
३. आमदार गोरे यांच्या वतीने अधिवक्ता धैर्यशील पाटील आणि अधिवक्ता ताहेर मणेर यांनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. अर्जावर २ डिसेंबर या दिवशी सुनावणी झाली. राजकीय कटकारस्थानातून हे षड्यंत्र रचले गेले असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत गोरे यांना तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ डिसेंबर या दिवशी होईल.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn