Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदुद्वेष्ट्यांनी हत्या केलेले पहिले हिंदु नेेते स्वामी श्रद्धानंद !

      दिशादर्शक नेता ठार झाल्यास हिंदु समुदाय दिशाहीन होतो, हे मानसशास्त्र ओळखून हिंदुद्वेष्ट्यांकडून पद्धतशीरपणे हिंदु नेत्यांना वेचून ठार मारले जात आहे. गेल्या काही वर्षांत एकट्या केरळमध्ये संघपरिवारातील १२५ जणांच्या हत्या करण्यात आल्या. ओडिशा राज्यात वर्ष २००८ मध्ये स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या केली गेली. हिंदुद्वेष्ट्यांच्या या खुनी परंपरेचे पहिले बळी स्वामी श्रद्धानंद होते. २३ डिसेंबर १९२६ या दिवशी अब्दुल रशीद नावाच्या धर्मांध मुसलमानाने त्यांची हत्या केली. आज त्यांचा ९० वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने...
१. स्वामीजींनी स्वत:चे नाव ‘श्रद्धानंद’ असे ठेवण्यामागील कारण !
      ‘स्वामी श्रद्धानंद म्हणजे लाला मुंशीराम. त्यांचा जन्म पंजाब येथील तलवन, जालंधर येथे २२ फेब्रुवारी १८५७ मध्ये झाला. त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी वानप्रस्थाश्रमाची दीक्षा घेतली आणि ते महात्मा मुंशीराम बनले. वर्ष १९०२ मध्ये हरिद्वारजवळील कांगडी भागात त्यांनी गुरुकुलाची स्थापना केली. सर्वप्रथम त्यांचे दोन पुत्र हरिश्‍चंद्र आणि इंद्र हे विद्यार्थी झाले, तर महात्मा स्वतः आचार्य झाले. आज सहस्रावधी विद्यार्थी तेथे शिक्षण घेतात आणि गुरुकुल कांगडी आता विश्‍वविद्यालय झाले आहे. सलग १५ वर्षे मुंशीराम यांनी गुरुकुलाची सेवा केली. त्यानंतर वर्ष १९१७ मध्ये महात्मा मुंशीराम यांनी विधिपूर्वक संन्यास दीक्षा घेतली. त्या दीक्षा समारंभात मुंशीराम म्हणाले की, मी स्वतःचे नाव स्वतःच ठेवणार आहे. माझे संपूर्ण जीवन वेद आणि वैदिक धर्माच्या श्रद्धेत व्यय झाले आहे आणि भविष्यातही होईल. यासाठी मी माझेे नाव श्रद्धानंद ठेवत आहे. तेव्हापासून ते स्वामी श्रद्धानंद झाले.
२. स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग !
     स्वामी श्रद्धानंद यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. पंजाबात मार्शल लॉ हा लष्करी दंडक लावला गेला, तर दुसरीकडे भारतियांवर रौलट अ‍ॅक्ट अन्यायाने लादण्यात आला. देहलीमध्ये त्या दंडकाच्या विरोधात आंदोलन चालू झाले. त्यांचे नेते स्वामी श्रद्धानंद होते. ब्रिटीश शासनाकडून मिरवणुका काढण्यास बंदी (मनाई) होती. त्याला आव्हान देण्यासाठी स्वामीजींनी घोषणा केली की, देहलीत मिरवणूक काढली जाईल. त्यानुसार सहस्रावधी देशभक्तांची मिरवणूक राजधानीच्या चांदणी चौकात आली. टाऊन हॉलच्या पटांगणात गुरख्यांच्या संगीनी, बंदुका आणि मशीनगन इंग्रजांच्या आज्ञेनुसार सज्ज होत्या. वीर संन्याशी श्रद्धानंद निर्भयतेने मोठ्या जमावानिशी घंटाघराच्या खाली पोचले. गोळी सुटताच स्वतः जलदगतीने ते पुढे सरसावले. छाती ताणून त्यानी गर्जना केली की, निर्दोष जनतेवर गोळ्या चालवण्यापूर्वी माझ्या छातीत संगीनी खुपसा. संगीनी खाली झुकल्या आणि मिरवणूक शांतपणे पुढे गेली.
३. देहलीच्या जामा मशिदीत उभे राहून वेदमंत्रासह भाषण करणारा वीर संन्यासी !
      वर्ष १९२२ मध्ये स्वामी श्रद्धानंद यांनी देहलीच्या जामा मशिदीत भाषण केले. स्वामी श्रद्धानंद यांनी मशिदीच्या मिंबरवर उभे राहून वैदिक मंत्र उच्चारण करून ओजस्वी आणि प्रभावी भाषण केले. एक मुसलमानेतर देहलीच्या जामा मशिदीच्या मिंबरवर चढून वेदमंत्रांसह भाषण देतो, हा सन्मान केवळ वीर संन्यासी स्वामी श्रद्धानंदांना प्राप्त झाला. ही जगातील ऐतिहासिक अद्वितीय घटना होती.
४. मुसलमानधार्जिणी काँग्रेस सोडून हिंदु महासभेच्या स्थापनेत सहभागी होणे
     स्वामी श्रद्धानंद यांना बारकाईने अभ्यास केल्यावर लक्षात आले की, मुसलमान काँग्रेसमध्ये येऊनही ते प्रथम मुसलमान बनून रहातात. नमाजासाठी काँग्रेसची सभाही स्थगित केली जाते; परंतु काँग्रेसमध्ये हिंदु धर्माची हानी होते. हे सत्य लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ काँग्रेस सोडली. त्यांनी पंडित मदनमोहन मालवीय यांच्यासह हिंदु महासभा स्थापन केली.
५. धर्मांतरितांच्या शुद्धीकरणासाठी केलेले महत्कार्य !
     मुसलमानांची संख्या वाढत आहे आणि हिंदूंची संख्या घटत आहे, या चिंतेचे निराकरण करण्यासाठी स्वामीजींनी शुद्धीकरणाचे पवित्र कार्य आरंभले. त्यांनी याच काळात अखिल भारतीय क्षत्रिय उपकारिणी सभेची स्थापना केली. या सभेचे प्रधान शहापुराधीश नाहरसिंहजी होते. सभेचे एक कार्यालय आग्रा येथे उघडण्यात आले. आग्रा, भरतपूर, मथुरा आदी क्षेत्रांमध्ये रहाणार्‍या नुकत्याच मुसलमान झालेल्या काही रजपुतांना परत हिंदु धर्मात येण्याची इच्छा होती. ५ लक्ष रजपुतांना शुद्ध करून आपल्या भाऊबंदांशी जोडण्याचा प्रश्‍न आग्रा येथील आर्य समाजाच्या विचाराधीन होता. हिंदु रजपुतांनी या शुद्ध हेतूस संमती दिली. तसेच ते त्यांना सामाजिक अधिकारही देण्यास सिद्ध झाले. या सगळ्या कार्यामध्ये स्वामी श्रद्धानंद यांचा पुढाकार होता. त्यानंतर एका भव्य संमेलनाचे आयोजन करून त्यात स्वामीजींनी आपल्या दुरावलेल्या बांधवांना जवळ केले आणि मोकळ्या मनाने शुद्ध करून घेतले. गंगाजल घेणे, यज्ञात आहुती देणे इत्यादी प्रकारे शुद्धीचक्र चालवले गेले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गावे शुद्ध करण्यात आली. या महान शुद्धीकार्यामुळे भारतातील हिंदूंमध्ये नवचैतन्य, नवी शक्ती, उत्साह संचारला आणि हिंदूंच्या संघटना वाढत गेल्या. कराची येथील अजगरीबेगम या मुसलमान महिलेला स्वामीजींनी हिंदु धर्मात घेतले. या घटनेमुळे मुसलमानांमध्ये आगडोंब उसळला आणि स्वामीजींचे नाव सर्वत्र झाले.
६. जिहादच्या हत्यार्‍या परंपरेचा बळी !
     २३.१२.१९२६ या दिवशी देहलीत रशीद नावाचा धर्मांध मुसलमान युवक स्वामीजींच्या घरी पोहोचला आणि ‘स्वामीजींसमवेत इस्लामवर चर्चा करावयाची आहे’, असे त्याने सांगितले. तो घोंगडे पांघरून आला होता. घोंगड्याच्या आत त्याने पिस्तूल लपवले होते. स्वामीजींसमवेत त्यांच्या सेवेसाठी धर्मपाल नावाचे गृहस्थ होते. त्यामुळे त्याला काही करता आले नाही. त्याने पिण्यास पाणी मागितले. त्याला पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यावर धर्मपाल पाण्याचा पेला ठेवण्यासाठी गेल्यावर रशीदने स्वामीजींवर पिस्तुलातील गोळ्या झाडल्या. धर्मपाल यांनी रशीदला पकडून ठेवले. सर्व लोक गोळा होईपर्यंत स्वामीजी हुतात्मा झाले होते. नंतर रशीदवर कार्यवाही करण्यात आली. स्वामी श्रद्धानंद जिहादच्या हत्यार्‍या परंपरेचा बळी ठरले; मात्र इतिहासात अजरामर झाले. त्यांनी धर्मासाठी केलेले बलीदान हिंदूंसाठी प्रेरणास्रोत ठरले !’
(संकलन : सौ. जयश्री जगन्नाथ परांजपे, ओरोस, सिंधुदुर्ग.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn