Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ‘राम मंदिर’ रेल्वेस्थानकाचे उद्घाटन

       मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) - नाव देण्यावरून बहुचर्चेत असलेल्या जोगेश्‍वरी-गोरेगाव रेल्वेमार्गावर बांधण्यात आलेल्या नवीन रेल्वेस्थानकाचे २२ डिसेंबर या दिवशी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये नवीन रेल्वेस्थानकाचे नामकरण ‘राम मंदिर रेल्वेस्थानक’, असे अधिकृतरित्या घोषित करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर खासदार श्री. गजानन कीर्तीकर, परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते, आमदार विद्या ठाकूर, राज्यमंत्री रवींद्र वायकर, वीर सेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल उपस्थित होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमापूर्वी येथील श्रीराम मंदिर ते नवीन रेल्वेस्थानकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn