Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे आज जिल्हा ग्रंंथालय संघाचे अधिवेशन !

     बार्शी (जिल्हा सोलापूर), १० डिसेंबर (वार्ता.) - सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ आणि बार्शी तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा बार्शी येथील संत तुकाराम सभागृह, शिवाजी महाविद्यालय येथे रविवार, ११ डिसेंबर यादिवशी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंंथमित्र गुलाबराव पाटील यांनी दिली. 

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांसह बार्शी येथील आमदार दिलीप सोपल हे उपस्थित रहाणार आहेत. ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ग्रंथालय, ग्रंथालयाचे कार्यकर्ते, कर्मचारी यांना विविध पुरस्कारांनी, मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. राजेंद्र दास 'वाचनसंस्कृती - काळाची गरज' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 
     तरी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय, कर्मचारी, संस्थाचालक आणि ग्रंथप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष चंद्रहंस गंभीर आणि सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक विजयकुमार पवार, जोतीराम गायकवाड यांनी केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn