Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

सर्वत्र तू व्यापून आहेस गुरुराया !
अधिवक्ता नागेश ताकभाते

जळी, स्थळी, काष्ठी अन् पाषाणी आहेस तू व्यापून ।
गुरुविना होईना ही जाणीव जीवनी ॥ १ ॥

दुःख-क्लेश, आशा-अपेक्षा अजून ना सुटती ।
मान-अपमानाच्या कोड्यांची गणिते भ्रमित करती ॥ २ ॥

मंदिर मंदिर धुंडून काढले तुझ्याशी नाते जोडायला ।
गुरुविना जमेना एकरूप व्हावयाला ॥ ३ ॥

देवगण (टीप) आले समवेत जोडली तुझ्याशी नाती ।
तळमळतो जीव हा का झालो अपयशी ॥ ४ ॥

कसे नाते जोडू तुझ्याशी हा मार्ग प्रक्रियेचा (टीप १) ।
गुरुविना फळेना ध्यास मार्गाचा ॥ ५ ॥ 

गुरुराया आता शरणागती स्वीकारली ।
पूर्णत्वाची इच्छा पूर्ण करण्या आशीर्वाद देशी ॥ ६ ॥

टीप - प्रगती केलेले साधक आणि संत
टीप १- स्वभावदोष, अहं निर्मूलन आणि गुणसंवर्धनाचा

- अधिवक्ता नागेश ताकभाते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१.२०१५)


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn