Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !
     ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
३. ब्राह्मतेजाद्वारे कार्य कसे होते ?
३ ए. संकल्पाचे कार्य म्हणजे ब्राह्मतेजाद्वारे होणारे कार्य ! : संकल्पाने कार्य सिद्ध होण्यासाठी आध्यात्मिक पातळी न्यूनतम ७० टक्के तरी असावी लागते. संकल्प कार्य कसे करतो, हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल.
     मनुष्यमात्राच्या मनाची शक्ती १०० एकक (युनिट) आहे, असे समजा. प्रत्येकाच्या मनात दिवसभर काही ना काही विचार येतच असतात. त्यासाठी काहीतरी शक्ती व्यय (खर्च) होत असते. एखाद्याच्या मनात असे दिवसात १०० विचार आले, तर त्याची त्या दिवसाची बरीच शक्ती संपून जाईल; परंतु त्याच्या मनात विचारच आला नाही, मन निर्विचार असले आणि अशा वेळी ‘अमुक एक गोष्ट घडो’, अशा प्रकारचा एक विचार त्याच्या मनात आला, तर त्या एका विचारामागे सगळी १०० एकक शक्ती असते; म्हणून तो विचार (संकल्प) सिद्ध होतो, यालाच ‘ब्राह्मतेज’ म्हणतात.
     तो विचार सत्चा असला, तर स्वतःची साधना त्यात व्यय होत नाही. ईश्‍वरच ते कार्य पूर्ण करतो; कारण ते सत्चे, म्हणजे ईश्‍वराचेच कार्य असते. हे साध्य होण्यासाठी नामस्मरण, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग या मार्गाने साधना करून ‘असत्चे विचारच मनात येत नाहीत’, अशी स्थिती साधकाने प्राप्त करून घेतली पाहिजे.
आता काहींना वाटेल की, खरेच असे संकल्पाने काही होते का ? जिथे विश्‍वाची निर्मितीच ईश्‍वराच्या संकल्पाने झाली आहे, तेथे संकल्पाइतके सामर्थ्यशाली काही नाही, हे लक्षात घ्या !
     आपण पुराणकाळातील गोष्टींमध्ये ऋषीमुनींनी शाप दिल्याची उदाहरणे ऐकतो. हा शाप म्हणजेच संकल्पाचे सामर्थ्य असते. साहजिकच हे संकल्पाचे सामर्थ्य ऋषीमुनींना साधनेच्या बळावर प्राप्त झालेले असते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केवळ शारीरिक पातळीवर प्रयत्न करून नव्हे, तर साधनेद्वारे संकल्पाचे सामर्थ्य प्राप्त करून कार्य करणे आवश्यक आहे.’ (२३.४.२०१२) (क्रमश:)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’)
     ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ हा ग्रंथ ऑनलाइन खरेदी करण्यासाठी ‘सनातन शॉप’च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn