Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली आस्थापनाला ११ लाख रुपयांचा दंड !

दिशाभूल करणार्‍या विज्ञापनाचे प्रकरण
     हरिद्वार - योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड आस्थापनाला चुकीच्या आणि अपसमज पसरवणार्‍या विज्ञापनासाठी ११ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दुसर्‍याचे उत्पादन स्वत:च्या नावावर खपवल्याचा पतंजलीवर आरोप आहे. ‘मिसब्रँडिंग’च्या एकूण ५ प्रकारांत पतंजली दोषी ठरल्याने हरिद्वारच्या न्यायालयाने पतंजलीच्या ५ उत्पादनांना हा दंड ठोठावला आहे. हा दंड एका महिन्याच्या आत भरायचा आहे. भविष्यात या उत्पादनांच्या बाबतीत सुधारणा झाली नाही, तर योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने अन्नसुरक्षा विभागाला दिले आहेत. १६ ऑगस्ट २०१२ या दिवशी पतंजलीचे मध, मीठ, तिळाचे तेल, जॅम आणि बेसन या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता सदोष आढळले होते. नमुन्यांची तपासणी उत्तराखंडच्या रुद्रपूर येथील अन्न आणि औषध चाचणी प्रयोगशाळेत झाली होती.
    अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ५२ (ब्रँडिंगविषयी दिशाभूल), कलम ५३ (दिशाभूल करणारे विज्ञापन) आणि अन्न सुरक्षा आणि दर्जा (पॅकेजिंग आणि लेबलिंग नियंत्रण कायदा, २०११) कायद्याच्या २३.१(५) या कलमांखाली पतंजलीला हा दंड ठोठावण्यात आला आहे. धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn