Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पश्‍चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर विनातिकीट प्रवाशांकडून ८ कोटी ७८ लक्ष रुपयांचा दंड जमा

हिंदु राष्ट्रात नियमांचे पालन करणारे नीतीमान नागरिकच असतील !
    मुंबई, २१ डिसेंबर पश्‍चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांवर नोव्हेंबर मासात केलेल्या कारवाईत पश्‍चिम रेल्वेने ८ कोटी ७८ लक्ष रुपयांचा दंड गोळा केला आहे. नोव्हेंबरमध्ये एकूण १ लक्ष ९८ सहस्र प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१५च्या तुलनेत अशा प्रवाशांच्या प्रमाणात या वर्षी २९.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आपले आरक्षित तिकीट दुसर्‍यांना वापरासाठी देणार्‍या ७३ जणांवरसुद्धा कारवाई करण्यात आली. १ सहस्र १०५ भिकारी आणि अनधिकृत फेरीवाले यांना रेल्वे परिसरातून बाहेर हाकलण्यात आले. (रेल्वे परिसर बकाल करणार्‍या अशांना केवळ हाकलण्यापेक्षा ते पुन्हा तेथे येऊ नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. - संपादक) त्यांपैकी ११८ जणांना अटक करण्यात आली आहे. तिकिटांचे आरक्षण करून देणार्‍या दलालांची पडताळणी करून रेल्वे अधिनियमांच्या अंतर्गत २१६ जणांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ‘प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये’, असे आवाहन पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn