Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या संदर्भातील पुढील सुनावणी ३ जानेवारीला !

कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरण
         कोल्हापूर, २२ डिसेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणात पोलिसांनी सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली होती. या प्रकरणी त्यांच्यावर आता नियमित न्यायालयात सुनावणी चालणार आहे. ही सुनावणी ज्यांच्याकडे होणार आहे, ते न्यायाधीश उपलब्ध नसल्याने २२ डिसेंबर या दिवशीची सुनावणी जिल्हा न्यायाधीश श्री. एस्.आर्. साळुंखे यांच्याकडे झाली. त्यांनी पुढील सुनावणी ३ जानेवारी २०१७ या दिवशी होईल, असे सांगितले. डॉ. तावडे यांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी कामकाज पाहिले.
         डॉ. तावडे हे सध्या पुणे येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. गतवेळेस त्यांना प्रत्यक्ष उपस्थित न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित करण्यात आले होते. २२ डिसेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीच्या काळात अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी डॉ. तावडे यांना पुढील वेळेस प्रत्यक्ष उपस्थित करण्याची मागणी न्यायाधिशांकडे केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn