Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निष प्रवास !

वाचा प्रतिदिन नवीन सदर
महर्षींची शिकवण आणि कार्य !
       ‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्राचे सर्व नैसर्गिक आपत्तींपासून आणि परकीय आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळावा, धर्माचे तसेच साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम आणि संशोधन केंद्रे इत्यादींना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत. अशा प्रकारे त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, तसेच महर्षि सांगत असलेल्या दैवी प्रवासाचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी प्रतिदिन हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’
११.१२.२०१६ - तिरुवण्णामलई, तमिळनाडू
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्याला ३ दिवस 
असलेला धोका टळण्यासाठी महर्षि उपाय करणार असणे 
     ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्याला आज आणि पुढील २ दिवस धोका आहे’, असे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले. ‘हे संकट टळण्यासाठी आज आपल्याला पुष्कळ काही उपाय करायचे आहेत’, असे ते म्हणाले. ते तसेच आम्ही दौर्‍यातील साधक आज येथील ‘अण्णामलई’ या शिवाच्या स्थानी असून जपजाप्य करत आहोत.
२. ‘हिंदु धर्माची पताका सार्‍या विश्‍वात फडकू दे आणि लवकर सनातन धर्म 
राज्याची स्थापना होऊ दे’, अशी प्रार्थना करण्यासाठी महर्षींनी तिरुवण्णामलई येथे पाठवणे 
     उद्या ‘कार्तिक दीपम्’ आहे. कार्तिक दीपम् हा तमिळनाडू राज्यामधील मोठा उत्सव मानला जातो. तिरुवण्णामलई येथील प्रत्यक्ष शिवस्वरूप असणार्‍या अण्णामलई पर्वताच्या शिखरावर या दिवशी ४४० किलो तुपाची ज्योत लावली जाते. या नेत्रदीपक सोहळ्याचे चैतन्य घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक या स्थानी येत असतात. 
     ‘हिंदु धर्माची पताका सार्‍या विश्‍वात फडकू दे आणि सनातन धर्म राज्याची स्थापना लवकर होऊ दे’, अशी प्रार्थना या शिवरूपी पर्वताच्या चरणांशी करण्यासाठी महर्षींनी आम्हाला या स्थानी पाठवले आहे. ‘हे भगवंता, आमच्याकडून तूच हे कार्य करवून घे आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद दे’, अशी तुझ्या चरणी या दीपोत्सवाच्या दिवशी तळमळीची प्रार्थना !
३. उत्सवाच्या दिवशी भाविकांना लुटणारे हॉटेलवाले आणि अशीही एक खंत ! 
     कार्तिक दीपम्च्या दिवशी तिरुवण्णामलई येथे लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. या वेळी येथे निवास करण्यासाठी जागा मिळणेही अवघड होते. भाविकांची अडचण ओळखून येथील हॉटेलवाले त्यांना अक्षरशः लुटतात. सर्वत्र खोल्यांचे भाडे दुपटीने वाढवले जाते. कधी कधी एका खोलीसाठी १५ सहस्र रुपयेही घेतले जातात. कलियुगातील माणूस किती स्वार्थी झाला आहे, हे यावरून लक्षात येते. आम्हीही यातून सुटलो नाही. शेवटी भाविक काय करणार ? राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आणि या स्थानातील चैतन्य मिळवण्यासाठी कधी कधी अशीही किंमत मोजावी लागते. हिंदु राष्ट्रात आपल्याला हे सर्व पालटायचे आहे !
४. अण्णामलई पर्वताला प्रदक्षिणा घालणे आणि रथयात्रेचे दर्शन घेणे 
     आज कार्तिकपुत्रीला, म्हणजे मला महर्षींनी दुपारी ४.३० नंतर येथील अण्णामलई पर्वताला प्रदक्षिणा (गिरीवलयम्) करायला सांगितले आहे. हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेतील अडथळे दूर करण्यासाठी आणि येणार्‍या भीषण आपत्कालात सर्व साधकांचे रक्षण होण्यासाठी महर्षींनी हे सांगितले आहे. ‘१४ कि.मी.ची ही प्रदक्षिणा झाल्यावर जेथून अण्णामलई पर्वताचे खालून वरपर्यंतचे दर्शन होते, अशा ठिकाणी उभे राहून कार्तिकपुत्रीने प्रार्थना करायला हवी’, असे महर्षींनी सांगितले आहे.
    कार्तिक दीपम्च्या आधी ९ दिवस येथे रथयात्रा असते. आज संध्याकाळी त्या रथयात्रेचे दर्शनही घ्यायला सांगितले आहे. ‘देवा, असाच आमचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा रथ पुढे पुढे जावो’, ही प्रार्थना.’
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (११.१२.२०१६, दुपारी १२.३४)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn