Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अमेरिकेतील पू. (सौ.) भावना शिंदे हर्ली यांना आलेल्या अनुभूती

पू. (सौ.) भावना शिंदे हर्ली
१. देवता काळ्या पाषाणाच्या मूर्तीच्या रूपात; 
परंतु जिवंत आणि तेजस्वी दिसणे 
१ अ. श्री विष्णु : ‘३.७.२०१६ या अमावस्येच्या दिवशी मी संध्याकाळी उपाय करतांना मला ‘श्रीविष्णु सोन्याच्या सिंहासनावर बसला आहे’, असे दिसले. श्रीविष्णु काळ्या पाषाणाच्या मूर्तीच्या स्वरूपात असला, तरी तो जिवंत आणि तेजस्वी दिसत होता.
१ आ. श्री विठ्ठल : ४.७.२०१६ या दिवशी दुपारी उपाय करतांना मला श्री विठ्ठलाचे कमरेपर्यंत दर्शन झाले. त्याचेही रूप काळ्या पाषाणाच्या मूर्तीसारखे असले, तरी ते जिवंत आणि तेजस्वी होते. 
    काही वेळाने माझे गाढ ध्यान लागले आणि त्यात ‘माझ्या उजव्या हातात त्रिशूळ आहे’, असे जाणवत होतेे. प्रत्यक्षात स्थुलातून माझ्या हातात काहीही नव्हते.
२. देवतांच्या चित्रांतून आणि न पेटवलेल्या उदबत्तीतून धूर निघतांना दिसणे 
    गेल्या अनेक दिवसांपासून न्यू जर्सीच्या निवासस्थानातील ध्यानमंदिरात असलेल्या देवतांच्या चित्रांतून मला धूर निघतांना दिसत आहे. ध्यानमंदिर आणि पूर्वी पू. लोलाआजी रहात असलेल्या आमच्या खोलीत न पेटवलेल्या उदबत्तीतूनही धूर निघतांना दिसतो.
३. तोंडवळ्यावर थंड पाण्याचे थेंब असल्याप्रमाणे मला जाणवणे 
    काही वेळा उपायांच्या वेळी माझ्या तोंडवळ्यावर थंड पाण्याचे थेंब असल्याप्रमाणे मला जाणवतेे. प्रत्यक्षात त्या वेळी माझा तोंडवळा कोरडा असतो.’ 
- (पू.) सौ. भावना शिंदे हर्ली, न्यू जर्सी, अमेरिका. (७.७.२०१६) 
पू. (सौ.) भावना शिंदे हर्ली
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn