Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शुक्रवारच्या नमाजासाठी मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना दुपारी ९० मिनिटांची सुटी !

उत्तराखंडच्या काँग्रेस सरकारचा मुसलमानांच्या लांगूलचालनासाठीचा निर्णय !
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांचे लांगूलचालन
करण्याचा इतिहास असणार्‍या काँग्रेसकडून याहून वेगळे काय घडणार !
     डेहराडून (उत्तराखंड) - उत्तराखंडमधील काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकांपूर्वीच मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना शुक्रवारच्या नमाजासाठी दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत म्हणजे ९० मिनिटांची सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस सरकारच्या या निर्णयावर भाजपचे प्रवक्ता नलिन कोहली यांनी टीका करतांना म्हटले आहे की, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की, धर्माच्या आधारावर निर्णय घेण्यात आला. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. यामुळे सर्वच गोष्टी धर्माच्या आधारे केल्या जाऊ शकतात. मतांसाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.      मुस्लिम पॉलिटिकल काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष तस्लीम अहमद रहमानी यांनी हा निर्णय केवळ राजकारणासाठी आणि मुसलमानांची मते मिळवण्यासाठीच घेतला गेला आहे. निवडणूक आयोगाने या निर्णयावर प्रतिबंध आणला पाहिजे, असे सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn