Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जिओ’च्या मागे लागून देवाने दिलेल्या अमूल्य वेळेचा अपव्यय करू नका !

     ‘आज अनेक जणांना आपल्याकडे ‘जिओ’ ही सुविधा हवी’, असे वाटते. ‘जिओ’ ही सुविधा येथून पुढे ३-४ मासांंसाठी (महिन्यांसाठी) विनामूल्य असल्यामुळे या अंतर्गत ‘इंटरनेट’चा वापर, भ्रमणभाषवरील बोलणे आणि लघुसंदेश पाठवणे, यांमध्ये लोक वेळ व्यर्थ दवडत असल्याचे दिसून येत आहे. 
      मानवाच्या जीवनात वेळ ही सर्वांत अमूल्य गोष्ट आहे. देवाने मनुष्यजन्म हा साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका करून घेण्यासाठी दिला आहे. आपले आयुष्य मर्यादित आहे आणि त्यातील एकेक मिनिटाचे मोल जाणून वेळेचा सदुपयोग करणे, हे मानवाच्या हातात आहे. देवाच्या कृपेने आपल्याला सेवेसाठी आवश्यक त्या सुविधा मिळत आहेत. प्रसारात असणार्‍या साधकांना या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो, हे खरे आहे; पण अन्य साधकांनी ‘विनामूल्य आहे; म्हणून अधिक वेळ बोलूया’, असा विचार करून स्वत:चा अमूल्य वेळ व्यर्थ घालवू नये.
     एक कार्यकर्ता म्हणाला, ‘‘मी एका मासात ९० जीबी ‘इंटरनेट’ वापरले. मी जिथे जातो, तिथे ‘वाय-फाय’ने इतरांना या सुविधेचा वापर करून देतो.’’ हे प्रमाण पहाता अनावश्यक व्हिडिओ बघण्यात वेळेचा जो अपव्यय झाला, त्याचे काय ? देव काटकसरी आहे. देवाचे गुण अंगिकारायचे असतील, तर विनामूल्य असली, तरी या सुविधेचा वापर काटकसरीनेच करायला हवा !
     मायेकडे नेणार्‍या या सुविधेचा वापर साधनेसाठी केला, तरच आपण देवाला प्रिय होणार, नाहीतर जीवनाची अपरिमित हानी होणार, हे निश्‍चित !’
- श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरु, कर्नाटक. (४.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn