Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबई प्रवेशद्वार आणि द्रुतगती मार्ग येथील पथकर नाक्यांवर इंधन उपकर चालू ठेवणार ! - सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्य नागरिकांना अजून किती दिवस पथकराच्या झळा सोसाव्या लागणार ? 
     नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - पथकरातील तूट भरून काढण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई शहराच्या प्रवेशदारावरील ५ पथकर नाके येथे इंधन उपकर चालू ठेवणे आवश्यक असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयवंत जाधव यांनी विधान परिषदेत मुंबईतील पथकराविषयी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नावर शिंदे यांनी वरील लेखी उत्तर दिले आहे. 

      त्या उत्तरात म्हटले आहे की, मुंबई, उपनगरे, ठाणे आणि नवी मुंबई या परिसरात बांधण्यात आलेले उड्डाणपूल अन अन्य कामांवर १२५८.९९ कोटी रुपये व्यय झाला आहे. पथकरातील ही तूट भरण्यासाठी पेट्रोलवर १ टक्का आणि डिझेलवर ३ टक्के उपकर लावला आहे. पथकर नाक्यांविषयी नेमलेल्या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला असून त्यावर शासन विचार करत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn