Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. गुरुदेवांशी मानस संवाद साधून वाढदिवसाच्या दिवशी कसे प्रयत्न करायला हवेत, याचे मार्गदर्शन घेणारी कु. योगिनी आफळे (वय १५ वर्षे) !

     ‘७.१२.२०१६ या दिवशी मी देवद आश्रमातील ध्यानमंदिरात बसून भावजागृतीचा प्रयोग करत होते. त्या वेळी प.पू. गुरुदेवांशी मनातून झालेला संवाद पुढे देत आहे.
१. प.पू. गुरुदेवांनी साधिकेला ‘स्वतःचा वाढदिवस आहे’,
असे न समजता ‘कृष्णाचा वाढदिवस आहे’, असा भाव ठेवण्यास सांगणे
मी : गुरुमाऊली, २१ डिसेंबरला माझा वाढदिवस आहे. त्या दिवशी मी कसा भाव ठेवायला हवा ? आणि कोणते ध्येय ठेवायला हवे ?
प.पू. गुरुदेव : ‘तुझा वाढदिवस आहे’, असे न समजता ‘कृष्णाचा वाढदिवस आहे’, असा भाव ठेव.
मी : कृतज्ञता गुरुमाऊली !
२. ‘स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी प्रयत्न केल्यावर
साधनेतील आनंद घेता येईल’, असे प.पू. गुरुदेवांनी सांगणे
गुरुमाऊली : तुझे चांगले चालले आहे. तुझ्यात काही गुणही आहेत; पण ते स्वभावदोष आणि अहं यांच्या पडद्याआड गेले आहेत. त्यामुळे तुला साधनेतील आनंद घेता येत नाही. स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी प्रयत्न करून तो पडदा सरकवून गुणांचा वारा तुझ्या अंत:करणात जाऊ दे.
      गुरुमाऊली, माझ्या वाढदिवशी मी तुमच्याशी स्थुलातून बोलू शकत नाही; पण तुम्ही आज मला विराट रूपातून दर्शन दिले. मी तुमचेे हे दर्शन आठवून तेे अनुभवण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही या रूपातून दिलेला आनंद अनुभवण्याचाही मी प्रयत्न करीन.
     ‘गुरुमाऊली, वाढदिवशी तुम्ही मला पुष्कळ आशीर्वाद द्या आणि तुमच्या चरणी लवकर घ्या’, ही शरणागत भावाने प्रार्थना !’ गुरुमाऊली, तुमचा अमूल्य वेळ मला दिलात, यासाठी तुमच्या कोमल चरणी कृतज्ञता !’
- कु. योगिनी आफळे (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn