Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या आणि नामस्मरणात मग्न असणार्‍या (कै.) श्रीमती चंद्रकलावतीदेवी ! (वय ८१ वर्षे)

   १४.९.२०१६ या दिवशी नोएडा येथील साधिका श्रीमती राजरानी माहुर यांच्या आई श्रीमती चंद्रकलावतीदेवी यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबात पती, ४ पुत्र आणि २ मुली आहेत. श्रीमती राजरानी माहुर यांना जाणवलेली आईची गुणवैशिष्ट्ये आणि आईच्या मृत्यूनंतर त्यांना आलेल्या अनुभूती देत आहोत.
१. नामजप करण्यातील सातत्य
   ‘अनुमाने ४० वर्षांपूर्वी एक संत माझ्या आजोबांना नामजप आणि त्याचे महत्त्व सांगत असतांना आईने ते सर्व ऐकले होते. तेव्हापासून आई नित्यनियमाने, कोणालाही न सांगता नामजप करत होती. यातून आईचे सातत्य आणि ईश्‍वरावरील श्रद्धा हे गुण लक्षात येतात.
२. परिस्थितीचा स्वीकार करणे 
  आईच्या जीवनात अनेक वेळा आर्थिक अडचणी आल्या. ती आयुष्यभर शेतात राबली. तिला कुटुंबातही फारसे महत्त्व दिले गेले नाही. तिला ४ मुले असूनही एकाच मुलाने तिला सांभाळले. त्या वेळी आईने ‘अन्य मुलांनीही मला सांभाळायला हवे’, असा विचार केला नाही. 
३. विकल्प नसणे
  एखादे वेळी आईला जेवण वाढले नसेल आणि तिला भोजनाविषयी विचारल्यावर ती सांगायची, ‘‘वहिनी व्यस्त असेल. तिला वेळ मिळाल्यावर ती जेवण देईल.’’ आईच्या मनात त्याविषयी कोणतीही प्रतिक्रिया नसे. 
४. निरपेक्ष प्रेम करणे
   ‘आईची कुणी तिच्याकडे लक्ष द्यावे किंवा तिला सुख मिळावे’, अशी अपेक्षा नव्हती. ज्या व्यक्ती तिच्याशी वाईट वागल्या, त्यांचे वागणे विसरून त्यांच्या मुलांशी आई चांगले वागत असे. 
५. कर्तेपणा नसणे 
   ती तिच्या नामजपाविषयी कोणाशीही बोलत नसे. मी ७ - ८ वर्षांपूर्वी आईला याविषयी विचारल्यावर तिने मला हे सर्व सांगितले. मी आता नामजप करते; म्हणून तिने हे सर्व मला सांगितले.
६. आईला भुकेची जाणीव नसे; परंतु ईश्‍वराची सतत आठवण होत असे.
७. आईने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ म्हणत असल्याचे सांगणे आणि
‘ते म्हणायचे विसरल्यावर ईश्‍वर आठवण करून देतो’, असे सांगणे 
१४.८.२०१६ या दिवशी माझे आईशी पुढील बोलणे झाले. 
मी : तुझ्या मनात काय असते ?
आई : ‘श्री गुरुदेव दत्त ।’ म्हणते. मध्येमध्ये विसरते.
मी : मग काय करतेस ?
आई : ईश्‍वराला ‘काय म्हणायचे ते विसरले’, असे सांगते. मग ईश्‍वर आठवण करून देतो.
मी ः तुला ईश्‍वर दिसतो का ?
आई : हो. पहा (एकीकडे बोट करत सांगितले.)
मी : ईश्‍वर दिसायला कसा आहे ?
आई : तो तो.... (सांगू लागली होती; पण नंतर म्हणाली ‘कसा दिसतो ते विसरले’)
(हे ती उत्साहाने सांगत होती. याविषयी ‘अजून सांगावे’, असे तिला वाटत होते.)
मी : जे तुझ्याशी वाईट वागले, त्यांच्याविषयी मनात राग आहे का ?
आई : त्यांनी जे केले, ते स्वार्थासाठी केले. त्याच्याशी माझे काही देणे-घेणे नाही.’
(कोणतीही प्रतिक्रिया नाही. आईने सहज उत्तर दिले. खरेतर आईने आयुष्यात पुष्कळ संघर्ष केला आहे.)
- सौ. राजरानी माहुर (कै. चंद्रकलावतीदेवीजींची मुलगी), नोएडा
८. आजीचे देहावसान झाल्यानंतर आलेल्या अनुभूती
अ. ‘आजीचा तोंडवळा शांत आणि सजीव वाटत होता. 
आ. वातावरणात दाब जाणवत नव्हता.
इ. आजीला गंगाजलाने स्नान घालत असतांना तिच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर ‘संतांना स्नान घालत आहेत’, असे वाटून माझी भावजागृती झाली.’ 
- श्री. जीतेन्द्र कुमार (कै. चंद्रकलावतीदेवीजींचा नातू)
ई. चारचाकीने गावी जातांना पंक्चर होऊनही कुठलीही दुर्घटना न होता चारचाकी व्यवस्थित चालणे : ‘१४.०९.२०१६ या दिवशी आम्ही नोएडाहून गावी जात होतो. राजमार्गावर गाडीचा वेग ८० किमी होता. अकस्मात् मोठा आवाज झाला; पण आम्ही तिकडे लक्ष दिले नाही. नंतर पुन्हा मोठा आवाज आल्यावर गाडी थांबवून पाहिले, तर पंक्चर असल्याचे लक्षात आले. पंक्चर होऊनही गाडी व्यवस्थित चालत होती. खरेतर इतका अधिक वेग असतांना दुर्घटना होऊ शकली असती. त्या वेळी ‘ईश्‍वरानेच वाचवले’, असे जाणवले.
उ. आईच्या निधनानंतर १२ व्या दिवशी ब्राह्मणभोजनाच्या वेळी वानरे आली होती.’
- श्रीमती राजरानी माहुर, नोएडा (४.१०.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn