Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तत्कालीन काँग्रेस सरकारमुळे हिंदुजा बंधू बोफोर्स प्रकरणातून सुटले !

घोटाळेबाज काँग्रेसच्या नेत्यांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा
होण्यासाठी सध्याच्या सरकारने प्रयत्न करावेत, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
    नवी देहली - ३१ मे २००५ या दिवशी देहली उच्च न्यायालयाने बोफोर्स आस्थापनासह सिरचंद, गोपीचंद आणि प्रकाशचंद या हिंदुजा बंधूंची सुटका केली. या निकालाच्या विरोधात सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची अनुमती नाकारण्यात आली, असे सीबीआयचे अधिवक्ता पी.के. डे यांनी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सांगितले. (वर्ष २००५ मध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि बोफोर्स प्रकरणात लाचखोरी केल्याचा गांधी परिवारावरच आरोप होता. त्यामुळे हिंदुजा बंधूंची सुटका होणे त्यांच्यासाठी आवश्यक होते. त्यामुळेच ही अनुमती नाकारण्यात आली, असेच म्हणावे लागतेे. आता याला आव्हान देण्यासाठी सध्याच्या सरकारने अनुमती दिली पाहिजे ! - संपादक)
१२ ऑगस्ट २०१० या दिवशी अजयकुमार अग्रवाल यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका १ डिसेंबरला सुनावणीसाठी आली, तेव्हा ते अनुपस्थित होते. त्यानंतर जानेवारीपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली.
    हिंदुजा बंधूंच्या सुटकेच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान न दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अजयकुमार अग्रवाल यांना याचिका प्रविष्ट करण्याची विशेष अनुमती दिली होती. देहली उच्च न्यायालयाने बोफोर्स प्रकरणात हिंदुजा बंधूंना आरोपमुक्त करतांना प्रकरण हाताळण्याच्या सूत्रावरून सीबीआयला कडक शब्दांत फटकारले होते. (न्यायालयाने फटकारण्यासमवेत असे करणार्‍यांची चौकशी करून त्यांना शिक्षा केली असती, तर ते अधिक योग्य ठरले असते ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn