Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रामनाथी आश्रम आहे तीर्थक्षेत्र !

१. ‘गोवा येथील एका पुण्यभूमीवर रामनाथी आश्रमाची निर्मिती झाली आहे.
२. रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले वास्तव्यास आहेत.
३. अशा ठिकाणी देवतांचे वास्तव्य असते.
४. या ठिकाणी साधक निष्काम भक्ती आणि सेवा करतात.
५. येथे ईश्‍वरी ज्ञानाचे आदान-प्रदान होते. ६. येथे मानवजातीचे कल्याण साधले जाते. या कारणासाठी तीर्थक्षेत्राची निर्मिती झाली आहे.
७. या ठिकाणी आकर्षित होणारी स्पंदने ही एका पवित्र तीर्थक्षेत्राप्रमाणे आहेत.
८. या ठिकाणी आल्यावर व्यक्तीच्या मनावर तोच परिणाम होतो, जो तीर्थक्षेत्री गेल्यावर होतो.
९. या ठिकाणी आल्यानंतर साधकाला कुठल्याही तीर्थक्षेत्री जायची आवश्यकता नाही.
१०. चार धाम आणि अनेक तीर्थ यांचे पुण्य साधकाला रामनाथी आश्रमात आल्यावर मिळते.
११. रामनाथी आश्रम हे येणार्‍या काळात भव्य (मोठे) तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होईल. लोकांना याचे महत्त्व कळेल आणि येथे ज्ञान अन् भक्ती वाढवून आपल्या जीवनाचे कल्याण होण्यासाठी आहे म्हणजेच मोक्षप्राप्तीसाठी ते येथे येतील.’
- कु. नंदिता वर्मा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.२.१०१६)
(साधिकेच्या भावामुळे साधिकेला ही अनुभूती आली आहे. ही साधिकेची वैयक्तिक अनुभूती आहे.’ - संकलक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn