Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींची शिकवण आणि कार्य !
    ‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’
१४.१२.२०१६ तिरुवण्णामलई, तमिळनाडू
२. महर्षींनी रामनाथी आश्रमाचा केलेला गौरव - रामनाथी आश्रम म्हणजे
प्रणव पीठच ! त्याच्या छत्राखाली असणारे सर्व साधक ‘ॐकार’ गोत्राचेच !
     ‘सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १०७’मध्ये महर्षि म्हणतात ‘शंकराचार्यांनी स्थापलेली धर्माची चार पीठे आज ‘शांकर पीठे’ म्हणून ओळखली जातात. येणार्‍या काळात परम गुरूंनी (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी) स्थापलेला रामनाथी आश्रम हा ‘प्रणव पीठ’ किंवा ‘आेंकार पीठ’ म्हणून ओळखला जाईल. पुढे याच प्रणवपिठातून गुरु कार्तिकपुत्रीला (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना) पाठवणार; म्हणूनच आम्ही (महर्षींनी) या शास्त्रींच्या (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या), तसेच त्यांच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावाअगोदर ‘ॐ’ लावण्यास सांगितले.
(‘पू. डॉ. ॐ उलगनाथन्, मुलगी ॐ अक्षरा आणि पत्नी ॐ पवित्रा’, असा सर्वांच्या नावापुढे ‘ॐ’ लावलेला आहे. त्याचे कारण आजच्या नाडीवाचनातून उलगडले. सौ. गाडगीळ) पुढेही लोकांना या प्रणवपिठाचे माहात्म्य कळेल. साधक ब्राह्मण आहेत कि आणखी कोणत्या जातीचे आहेत, हा विषयच येथे नको; कारण साधक या ‘ॐकार’ पिठाच्याच छत्राखाली असल्याने ते ‘ॐकार’ गोत्राचेच आहेत.’ (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १०७, तिरुवण्णामलई, तमिळनाडू, १४.१२.२०१६)
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (१७.१२.२०१६, सकाळी ७.५२)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn