Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात सापडले छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित पत्र !

        पुणे, २१ डिसेंबर - शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. केदार फाळके यांना धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची कामकाजाची पद्धत, राजकीय आणि प्रशासकीय धोरण अधोरेखित करणारे अप्रकाशित पत्र मिळाले आहे.
        शिवछत्रपतींच्या कार्यावर डॉ. फाळके यांनी विद्यावाचस्पती (पी.एच्डी.) पदवी मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी ते धुळ्यामधील दफ्तरखान्यातील पत्रे अभ्यासासाठी चाळत होते. त्या वेळी त्यांच्या हाती महाराजांचे अस्सल मुद्रा उमटवलेले हे पत्र हाती लागले. साताराचे सुभेदार अबाजी मोरदेव यांना महाराजांनी राज्याभिषेकापूर्वी हे पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये पाटीलकी वतनासंबंधात कान्होजी खराडे आणि काळभर यांच्यातील वादावर दिलेला निवाडा आहे. हे पत्र स्वराज्यातील प्रशासनात २७ जुलै १६७३ मध्ये प्रविष्ट झाले. स्वराज्यात प्रविष्ट झालेल्या प्रदेशाची प्रशासकीय व्यवस्था लावण्यासंबंधी छत्रपती शिवाजी महाराज यांची दक्षता या पत्रातून दिसून येत असल्याचे डॉ. फाळके यांनी सांगितले.
        त्यांनी पुढे सांगितले की, या पत्रावर २ ओळींनंतर महाराजांच्या प्रधानाचा शिक्का असून पत्राच्या शेवटी महाराजांच्या मुद्रा आहेत. शिवाय भारत इतिहास संशोधक मंडळात असणार्‍या महाराजांच्या अस्सल कौलनाम्यातल्या हस्ताक्षरासारखे हस्ताक्षर या पत्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आजवर जवळपास २५० हून अधिक पत्रे मिळाली आहेत. या पत्रातील अक्षर, वाक्यरचना, भाषाशैली ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अन्य पत्रांसारखीच आहे. या पत्रावर आणखी संशोधन चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn