Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
‘     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’
१३.१२.२०१६ - तिरुवण्णामलई, तमिळनाडू
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकरता सद्गुरु (सौ.) अंजली 
गाडगीळ यांच्यावर केलेला अभिषेक आणि त्यांचे वस्त्रदान म्हणजे 
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कायाकल्प होऊन त्यांना नवीन जीवन प्राप्त होण्यासारखेच असणे
      ‘कालच्याच विधीचा पुढचा भाग म्हणून आज पूजन केलेल्या त्या कलशांतील एकत्रित पाण्याने माझ्यावर श्री मूकांबिकादेवीसमोर अभिषेक करण्यात आला. त्या वेळी ‘माझा देह म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचाच देह आहे’, असा भाव मला ठेवण्यास सांगितले होते. तसेच महामृत्यूंजय मंत्रजप आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तोंडवळ्याचे स्मरण करण्यासही सांगितले होते. अभिषेक झाल्यावर मला मी नेसलेली साडी दान करण्यास सांगितले. हा अभिषेक आणि साडी दान करणे म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कायाकल्प होऊन त्यांना नवीन जीवन प्राप्त झाल्यासारखेच आहे. हा विधी निर्विघ्नपणे पार पडला.
२. देवीने साक्ष देणे
     हा विधी झाल्यावर मी श्री मूकांबिकादेवीला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आरोग्य चांगले रहावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यांसाठी प्रार्थना करतांना देवीच्या गळ्यातील हार खाली पडला. देवीने प्रार्थनेनुसार होणार असल्याची साक्ष आम्हाला दिली. या प्रसंगाचे चित्रीकरणही मिळाले आहे.
३. महर्षींच्या सांगण्यानुसार नवीन सेवाकेंद्राच्या प्रवेशद्वारासाठी लाकडी चौकट विकत घेणे
    महर्षींच्या कृपेने साधकांसाठी एक सेवाकेंद्र बांधणे चालू आहे. त्याच्या प्रवेशद्वाराची चौकट आजच्या शुभमुहूर्तावर विकत घेण्यास महर्षींनी सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्यासह जाऊन सागवानी लाकडाची चौकट दुकानातून निवडली आणि चौकटीवर लावण्यासाठी लाकडाचे गजलक्ष्मीचे चित्रही निवडले. ही खरेदी दुपारी ३ वाजण्याच्या आत पूर्ण करण्यात आली; कारण त्यानंतर राहूकाळ आरंभ होणार होता.’
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (१३.१२.२०१६, दुपारी २.३०)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn