Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाक एका आतंकवाद्याला १ कोटी रुपये देतो !

आतंकवाद्यांच्या आक्रमणात नाहक हुतात्मा होणार्‍या भारतीय 
सैनिकांच्या कुटुंबियांना सरकार साहाय्य म्हणून तरी इतकी रक्कम देते का ?
     मुझफ्फराबाद - भारत-पाकमधील नियंत्रण रेषा ओलांडण्यासाठी आणि आत्मघातकी आक्रमणे घडवून आणण्यासाठी पाक एका आतंकवाद्याला १ कोटी रुपये देतो, अशी माहिती पाकव्याप्त काश्मीरमधील ‘जम्मू-काश्मीर अमन फोरम’चे नेते रईस इन्कलाबी यांनी दिली आहे.
     इन्कलाबी म्हणाले, ‘‘आतंकवाद्यांना भारताच्या विरोधात उभे करण्याचे काम पाकिस्तान करतो. पाकच्या या कारवाया दोन्ही देशांतील तणावाचे मुख्य कारण आहे. आमचा याला विरोध आहे. तुम्हाला गोळीबाराची आणि युद्धाची एवढी खुमखुमी असेल, तर सैन्याला सैन्याशी भिडवा.’’ 
     ‘पाकमध्ये ज्या आतंकवादी संघटनांवर बंदी आहे, त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये रान मोकळे करून देण्यात आले आहे. येथून भारतविरोधी कारवाया करण्याची त्यांना मुभा आहे. हे दुटप्पी धोरण का ?,’ असा प्रश्‍नही इन्कलाबी यांनी केला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn