Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प्रतापगडावर शिवप्रतापदिनासाठी उपस्थित रहाण्यास जिल्हाबंदी करू नये ! - नितीन शिंदे, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक

भाजप शासनाच्या काळात शिवभक्तांना प्रतापगडावर
उपस्थित रहाण्यास बंदी करण्यात येते, हे अपेक्षित नाही !
      सांगली, ४ डिसेंबर (वार्ता.) - शिवप्रतापदिनाच्या दिवशी प्रतापगडावर होणार्‍या शिवप्रतापदिन उत्सव सोहळ्यास उपस्थित रहाण्यास सातारा जिल्हा बंदी का करू नये, अशा आशयाची नोटीस सातारा जिल्हाधिकार्‍यांनी मला बजावली आहे. या संदर्भात माझ्यासह समस्त शिवप्रेमींनी सातारा येथे जाऊन खुलासा दिला आहे. माझ्यासारख्या शिवभक्ताला प्रतापगडावर शिवप्रताप दिनासाठी उपस्थित रहाण्यास जिल्हाबंदी करू नये, अशा मागणीचे पत्र मी प्रशासनाला दिले आहे, अशी माहिती शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक श्री. नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      ते पुढे म्हणाले, गेली १२ वर्षे सातारा प्रशासनाकडून मला सातारा जिल्हाबंदी करण्यात येत आहे. वास्तविक माझ्यासह तमाम शिवभक्तांनी केलेल्या आंदोलनामुळे तत्कालीन शासनाला तेथील उरुस बंद करावा लागला. सध्या उच्च न्यायालयानेही अफझलखानाच्या थडग्याभोवती उभे राहिलेले अवैध बांधकाम तोडा, असे आदेश दिले आहेत. त्यावर सध्याचे शासनही काहीच कृती करत नाही. त्यामुळे आम्ही आता न्यायालयाच्या निर्णयाची कार्यवाही होत नसल्याविषयी अवमान याचिका दाखल करणार आहोत. या वेळी अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, सर्वश्री अमर पडळकर, आदित्य पटवर्धन, रोहित घुबडे, चेतन भोसले, गजानन मोरे, स्वप्नील कुंभोजकर यांसह अन्य उपस्थित होते.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn