Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निष प्रवास !

    महर्षींची शिकवण आणि कार्य !
    ‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’
११.१२.२०१६ - तिरुवण्णामलई, तमिळनाडू रथयात्रेच्या वेळी महर्षींनी घेतलेली परीक्षा 
      ‘आज मला महर्षींनी येथे कार्तिक दीपम्च्या निमित्ताने संध्याकाळी असलेल्या रथयात्रेचे दर्शन घ्यायला सांगितले होते. त्याप्रमाणे मी गेले. सहस्रो लोकांची गर्दी होती. त्या गर्दीमध्येही मी पुढे रथाजवळ गेले. त्याला स्पर्श करून नमस्कार केला आणि हिंदु राष्ट्राची स्थापना जलद गतीने होण्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर रात्री नाडीवाचनात महर्षि नाडीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना म्हणतात, ‘आम्ही कार्तिकपुत्रीला (मला) या दैवी प्रवासाच्या सेवेसाठी का निवडले आहे ते कळले ना ? तिने आम्ही सांगितल्याप्रमाणे नुसते रथयात्रेचे (लांबून) दर्शन घेतले नाही, तर आपणहून रथाजवळ जाऊन त्याचे भावपूर्ण दर्शन घेतले. याप्रमाणे ती प्रत्येक कृती आम्हाला अपेक्षित अशीच करते.’
      यावरून लक्षात येते की, महर्षि आपली प्रत्येक क्षणी परीक्षा घेत असतात. खरेतर ते परीक्षा घेतात, तेच भावपूर्ण कृती करण्याचा विचार मनात घालतात, परीक्षेत उत्तीर्ण करतात आणि वरीलप्रमाणे कौतुकही करतात !
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (१२.१२.२०१६, दुपारी २)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn