Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आध्यात्मिक उपायांची आठवण करून देणारा, सांगितलेले लगेच कृतीत आणणारा आणि आनंदी असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रत्नागिरी येथील चि. चैतन्य मच्छिंद्र खेराडे (वय २ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र
(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. चैतन्य खेराडे एक दैवी बालक आहे !
चि. चैतन्य खेराडे
     रत्नागिरी येथील दैवी बालक चि. चैतन्य मच्छिंद्र खेराडे याचा ११ डिसेंबर २०१६ (मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशी) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याचे आई, बाबा आणि अन्य साधकांनी लिहून दिलेली त्याची गुणवैशिष्ट्ये प्रसिद्ध करत आहोत.
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
      ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. सौ. मधुरा खेराडे (चैतन्यची आई) 
१ अ १. उपायांसाठी देवतांची चित्रे लावली नसल्यास आठवण करून देणे : ‘मी चि. चैतन्यला प्रतिदिन उपायांसाठी देवतांची चित्रे लावते. एखाद्या दिवशी ती लावली नसतील, तर त्या वेळी तो ‘उपाय, उपाय’ असे म्हणून आठवण करून देतो. 
१ अ २. प्रतिदिन अंघोळ झाल्यावर देवाला न चुकता नमस्कार करणे : आम्हाला देवाला नमस्कार करतांना पाहून चैतन्य नमस्कार करण्यास शिकला. प्रतिदिन अंघोळ करून झाल्यावर तो देवाला न चुकता नमस्कार करतो. आम्ही संध्याकाळच्या वेळेत कुठे बाहेर गेल्यावर एखाद्या ठिकाणी तुळशीजवळ दिवा लावलेला असला, तर तो थांबून हात जोडून नमस्कार करतो.
१ अ ३. कोणतीही गोष्ट एकदाच सांगितल्यास लगेच आत्मसात करणे : आम्ही २.११.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात गेलो होतो. त्या वेळी श्रीमती आगावणेकाकूंनी चैतन्यला ‘श्रीकृष्ण कसा उभा रहातो’, हे एकदाच दाखवले. घरी आल्यावर आम्ही त्याला विचारले, ‘श्रीकृष्ण बाप्पा कसा उभा रहातो ? तो सुदर्शनचक्र कसे सोडतो ?’ त्यावर त्याने लगेच तसे करून दाखवले. यावरून ‘त्याला कोणतीही गोष्ट एकदाच सांगितली, तरी तो लगेच आत्मसात करतो’, हे लक्षात आले.
१ अ ४. घरकामात साहाय्य करणे : चैतन्य प्रतिदिन मला छोट्या-छोट्या कामांमध्ये साहाय्य करतो, उदा. झोपतांना अंथरुण आणणे, जेवणानंतर ताट-वाट्या उचलणे. 
१ अ ५. सांगितलेले कृतीत आणणे 
अ. आमच्या बाजूला रहाणारे सर्वजण चैतन्यला ‘मम्मी-पप्पा’ म्हणायला शिकवायचे. सनातनचे साधक श्री. गणेश घडशी यांनी त्याला ‘आई-बाबा’ म्हणायला शिकवले. तेव्हापासून तो आजपर्यंत कधीही ‘मम्मी-पप्पा’ म्हणाला नाही. त्याला सांगितलेली गोष्ट तो लगेच कृतीत आणतो, हे लक्षात आले. 
आ. दिवाळीपूर्वी सनातन-निर्मित आकाशकंदील सिद्ध करण्याची सेवा आमच्या घरी चालू होती. चैतन्यला एकदाच ‘आकाशकंदिलांना हात लावू नको’, असे सांगितल्यावर नंतर ८ दिवस सेवा चालू असतांना त्याने एकदाही हात लावला नाही. 
१ अ ६. सनातन-निर्मित आकाश कंदिलांनाही उदबत्ती दाखवून नमस्कार करणे : आम्ही संध्याकाळी देवासमोर उदबत्ती लावतो. त्या वेळी चैतन्य सनातन-निर्मित आकाश कंदिलांनाही उदबत्ती दाखवतो आणि नमस्कार करतो.’
१ आ. श्री. मच्छिंद्र खेराडे (चैतन्यचे वडील) 
१ आ १. ‘आवड-निवड अल्प असल्याने चि. चैतन्य सर्व भाज्या खातो. 
१ आ २. तो कुठेही गेला, तरी तिथे असणार्‍यांशी मिळून मिसळून वागतो.
१ आ ३. स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करणे : दात घासणे, पिण्यासाठी पाणी घेणे, जेवणे, घेतलेली भांडी बेसिनमध्ये ठेवणे, अंघोळ करणे इत्यादी कृती तो स्वत: करण्याचा प्रयत्न करतो. 
१ आ ४. स्वयंशिस्त असणे : शेजारी किंवा सेवाकेंद्रात गेल्यावर ज्या वस्तू वापरण्यासाठी घेतल्या आहेत, त्यांचा वापर करून झाल्यावर तो त्या जागेवर ठेवतो. 
१ आ ५. इतरांच्या कृतीतून शिकणे : ‘जेवतांना नमस्कार करणे, चप्पल नीट लावून ठेवणे’, अशा इतरांच्या कृती पाहिल्यावर तो लगेच तसे कृतीत आणतो. 
१ आ ६. नामजप करणे : नामजप करायला सांगितल्यावर तो ‘विजय असो’ असे म्हणतो आणि त्याला पूर्ण नामजप करता येत नसल्याने ‘ॐ, ॐ’ असा नामजप करतो. 
१ आ ७. सर्वांशी आदराने बोलणे : चैतन्य कोणालाही ‘ओ, अहो’ अशी आदरार्थी हाक मारतो. रामनाथी आश्रमात गेल्यावर सगळेजण ‘नमस्कार’ म्हणायचे; परंतु त्याला तसे बोलता येत नसल्याने तो सर्वांना नमस्कार करत होता.
१ आ ८. इतरांची काळजी घेणे : कोणी आजारी असले की, तो त्यांची काळजी घेतो. अंग दुखत असेल, तर अंग आणि पाय चेपून देतो.
१ आ ९. सहनशील : मे मासात (महिन्यात) त्याच्या पूर्ण तोंडवळ्यावर आणि डोक्यावर उष्णतेमुळे फोड आले होते. उष्णतेमुळे होणारा त्रास त्याने एक ते दीड मास (महिना) शांतपणे सहन केला. आताही तो आजारी असला किंवा काही दुखत असेल, तर तो सांगत नाही.’
१ इ. सौ. मंजिरी बेडेकर (रत्नागिरी सेवाकेंद्रातील साधिका)
१ इ १. ‘आश्रमात आल्यावर सर्व साधकांजवळ तो आनंदाने जातो आणि सर्वांसमवेत खेळतो.
१ इ २. आवड-निवड नसणे : चि. चैतन्यला कोणताही खाऊ दिल्यावर तो आवडीने खातो. 
१ इ ३. हसरा तोंडवळा आणि आनंदी असणे : चैतन्य नावाप्रमाणे आहे. त्याला पहाताच आपला आळस निघून जातो. त्याचा तोंडवळा हसरा आणि सतत आनंदी असतो. तो आश्रमात आला की, सर्वांना आनंद वाटतो. 
१ इ ४. सेवा करतांना त्रास न देणे : साधक सेवा करत असतांना तो कोणालाही त्रास देत नाही. तो एकटाच खेळत रहातो. त्याला खेळायला कोणतीही वस्तू चालते. 
१ इ ५. उंच ठिकाणची वस्तू काढतांना भीती नसणे : त्याला उंच ठिकाणची वस्तू पाहिजे असेल, तर ती काढण्यासाठी छोटे टेबल घेऊन येतो आणि त्यावर उभा राहून ती वस्तू घेतो. त्या वेळी त्याला भीती वाटत नाही. 
१ इ ६. वडिलांच्या कृती लक्षपूर्वक पाहून त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करणे : त्याचे बाबा गाडी दुरुस्ती किंवा स्वच्छतेची सेवा करतांना तो लक्षपूर्वक पहातो आणि पुन्हा ती उपकरणे दिसली की, बाबांप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करतो. 
१ इ ७. पू. नकातेकाकांकडे गेल्यावर इतरांकडे न जाणे : एकदा पू. नकातेकाका (सनातनचे संत पू. महादेव नकाते) सेवाकेंद्रात आले होते. त्या वेळी तो त्यांच्याकडे गेल्यावर इतरांकडे परत आला नाही. तो त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून झोपला. 
१ इ ८. देवतांची चित्रे पाहून डोके टेकवून नमस्कार करणे : त्याला ‘बाप्पाला नमस्कार कर’, असे सांगावे लागत नाही. देवतांची चित्रे दिसल्यावर तो लगेच डोके टेकवून नमस्कार करतो. तसा नमस्कार करण्यास तो लाजत नाही. काही वेळा तो सर्वांना नमस्कार करतो. 
१ इ ९. चैतन्यसमवेत खेळतांना बाळकृष्णासमवेत खेळत असल्याचे वाटणे : तो ‘आजी, आजी’ म्हणत घरात येतो. त्याच्या समवेत खेळतांना ‘बाळकृष्णासमवेत खेळत आहे’, असे मला वाटते. त्याने खोडी केली, तर तो हळूच बाळकृष्णासारखा हसतो. त्यामुळे त्याला पहाताच हसू येते.’ 
१ ई. ‘आम्ही जयघोष करत असतांना चैतन्यही ‘जय’ असे म्हणतो.’ - कु. श्रद्धा घडशी, रत्नागिरी
२. स्वभावदोष 
१. ‘चैतन्यला लगेच राग येतो.
२. एखादी गोष्ट मिळण्यासाठी तो हट्ट करतो.’
- सौ. मधुरा खेराडे (चैतन्यची आई)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn