Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘इस्लामिक स्टेट’च्या हस्तकाने पोलिसांना फसवण्यासाठी केले धर्मांतर !

   भाग्यनगर - सहकार्‍यांना अटक झाल्यानंतर अन्वेषण यंत्रणांना मूर्ख बनवण्यासाठी ख्रिस्ती धर्मात प्रवेश केलेल्या अबिद खान या ‘इस्लामिक स्टेट’च्या हस्तकाला नुकतीच हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथे अटक करण्यात आली. अबिद खान याच्या ५ सहकार्‍यांना हैदराबाद येथे, तर ३ सहकार्‍यांना बेंगळुरू येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर अबिद खान याने बेंगळुरू येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारून पॉल असे नाव धारण केले होते, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी दिली. 
   सुरक्षा यंत्रणा अबिद खान याच्या मागावर होती. त्यामुळे धर्मांतर केल्यानंतर त्याने हिमाचल प्रदेशच्या कुल्लु येथे रहाणे पसंत केले. सिरीयामध्ये परतण्याची त्याची योजना होती, अशी माहिती कुल्लुचे पोलीस अधीक्षक पदम चंद यांनी दिली. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर अबिद खान श्रीलंकेत जाऊन आले. भारतात परतल्यानंतर बेंगळुरूमध्ये धर्मांतर केलेल्या चर्चशी त्याने संपर्क साधला. त्याच चर्चने त्याला कुल्लु येथे आश्रय घेण्यास साहाय्य केले होते. (धर्मांतर करून घेणार्‍याची पार्श्‍वभूमी चर्चने का जाणून घेतली नाही, याचीही अन्वेषण यंत्रणांनी चौकशी करायला हवी ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn