Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातनचा आधारस्तंभ सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१३.१२.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचे लिखाण प्रसिद्ध करत आहोत
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! 

     गेल्या १५ वर्षांत सनातन संस्थेच्या २९६ ग्रंथांच्या ६६ लक्षांहून अधिक प्रती अनेक भारतीय भाषांतच नव्हे, तर जर्मन आणि स्पॅनिश या भाषांतही प्रकाशित झाल्या आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अध्यात्मातील अनेक सूत्रांच्या संदर्भात ‘का आणि कसे’, यांची उत्तरे सनातनच्या ग्रंथांत दिलेली आहेत. उत्तरांचे श्रेय पूर्वीच्या सौ. अंजली गाडगीळ, म्हणजे आताच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना आहे. त्यांना मिळणार्‍या ज्ञानामुळे माझी स्वतःची अध्यात्मशास्त्रावर पूर्ण श्रद्धा बसली. सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांचे महत्त्व म्हणजे एवढे अपूर्व ज्ञान मिळत असूनही त्यांच्यात अजिबात अहं नाही. त्यामुळेच वर्ष २००० मध्ये सनातनमध्ये आल्यापासून केवळ १६ वर्षांत त्यांनी सद्गुरुपदापर्यंत वाटचाल केली. सद्गुरु (सौ.) गाडगीळ साधिका आणि गुरु या दोन्ही अवस्थांत होत्या, तेव्हाही त्यांचे बोलणे, चालणे, वागणे अत्यंत आदर्श होते. त्यांच्या सहवासाचा लाभ घेऊन अनेक साधकांनी प्रगती केली आहे. 


     त्यांच्याकडून जेव्हा ज्ञान मिळण्यास प्रारंभ झाला, तेव्हा मला आश्‍चर्याचा धक्काच बसला; कारण ‘असे ज्ञान कोणाला मिळू शकते’, याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. माझ्या स्वभावाचे ‘तीव्र जिज्ञासा’ हे एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गोष्टीचे ‘का आणि कसे’ जाणून घ्यायची मला तीव्र जिज्ञासा असल्यामुळे मी अनेक संतांना प्रश्‍न विचारायचो. सौ. गाडगीळ यांची भेट झाल्यानंतर मला एकाही संतांना एकही प्रश्‍न विचारावा लागला नाही. एवढेच नव्हे, तर ‘संत सांगू शकणार नाहीत’, असे ज्ञान सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांच्याकडून मला रात्रंदिवस कधीही उपलब्ध झाले आहे. 
     आता त्या शब्दांच्या पुढच्या स्तराला असल्यामुळे ज्ञानप्राप्तीऐवजी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. भारतातील अनेक ठिकाणचे संत सनातनच्या कार्यात सहभागी झाले आहेत. हे केवळ सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांच्यामुळेच झाले. एवढेच नव्हे, तर त्यांच्यामुळेच सप्तर्षि जीवनाडी वाचून भविष्य सांगणारे तमिळनाडूमधील पू. डॉ. ॐ उलगनाथन् आणि पंजाबमधील भृगु नाडीवाचक डॉ. विशाल शर्मा हे सनातनचेच झाले आहेत. अनेक संत आणि हे दोघे नाडीवाचक सनातनला पावला-पावलावर साहाय्य करत आहेत. त्यामुळे आता मला पुढील अध्यात्मप्रसाराच्या कार्याचा जराही विचार करावा लागत नाही. ‘
     सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची पुढील प्रगती ऋषि करून घेणारच आहेत’, याची मला खात्री आहे. त्यामुळे ‘त्यांच्या प्रगतीसाठी श्रीकृष्णाला प्रार्थना करूया’, असा विचार एकदाही माझ्या मनात आला नाही. एवढेच नव्हे, तर माझे अध्यात्मप्रसाराचे कार्य पूर्णत्वाला कोण नेणार, याची काळजीही सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामुळे दूर झाली आहे. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासारख्या अधिकारी सद्गुरु सनातनला लाभल्या याबद्दल मी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’ 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn