Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

साधकांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम देणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अतिशय भक्तीभाव असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे महर्लोकवासी रंजन देसाईकाका !

१. एका आस्थापनाचे मालक असूनही सर्वसामान्यांसारखे वागणे
     देसाईकाकांचे घरचे राहणीमान सुखवस्तू आहे. त्यांना स्वत:ला घरातील कुठलीच कामे करण्याची कधी वेळ आली नाही. काही अडचण आली, तरी त्यांच्या आस्थापनातील (कंपनीतील) कामगारही त्यांच्या हाताशी असत. पंचक्रोशीतही ते देसाईसाहेब म्हणून प्रसिद्ध होते. तरीही स्वत:चे स्वत:च सर्व करणे, सर्वसामान्यांसारखे रहाणे, आश्रमजीवन स्वीकारणे अशा सर्वच गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण होत्या. - श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल आणि सर्व साधक, सनातन सेवाकेंद्र, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२१.११.२०१६)
२. परिस्थिती स्वीकारणे
     काका त्यांचे मेहुणे आणि जावई यांना व्यवसाय कशा प्रकारे करावा ?, याविषयी अधूनमधून सांगत असत. मध्यंतरी एका घरगुती प्रसंगामुळे काकांच्या मनात एका नातेवाइकाविषयी तीव्र अपेक्षेचे विचार येत होते. त्या वेळी काकांशी बोलतांना त्यांना त्यांच्याकडून साधनेच्या व्यतिरिक्त अन्य कुठलीही अपेक्षा नाही, असे माझ्या लक्षात आले. नंतर एकदा मी त्यांच्या मेहुणे आणि जावई यांच्याशी सहजतेने बोललो. तेव्हा ते म्हणाले, आम्ही व्यवसायातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासमवेत दायित्व घेऊन साधनाही करू. आम्हाला काकांच्याच प्रकृतीची काळजी वाटते. नंतर मी त्याविषयी काकांना कल्पना दिल्यावर काकांनी ती गोष्ट मनापासून स्वीकारली.
३. साधकांवर निरपेक्ष प्रेम करणे 
३ अ. साधकांवर कुटुंबियांप्रमाणेच प्रेम करणे 
१. पूर्वी काका स्वत:सह कुटुंबीय आणि सेवाकेंद्रातील साधक यांच्यासाठी फळे मागवायचे. फळे आल्यावर प्रथम ते सेवाकेंद्रातील संत आणि साधक यांना वाटायचे आणि नंतर स्वत:च्या घरी पाठवायचे. - श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.११.२०१६) 
२. देसाईकाका यांना कु. स्नेहा झरकर, सौ. अश्‍विनी पवार आदी मुली लहान वयात घरदार सोडून साधना करण्यासाठी आश्रमात रहातात, याविषयी नेहमी कौतुक वाटायचे. तसेच त्या सर्वांसाठी ते प्रेमाने खाऊ आणून द्यायचे. 
३. देवद आश्रमात गेल्यावरही काका प्रतिवर्षी त्यांच्या बागेतील आंबे, चिकू, फणस इत्यादी मागवून देवद आश्रमातील सर्व साधकांसाठी देत असत आणि रामनाथी आश्रमातही ते पाठवत. त्याविषयी हे सर्व देवाचे आहे आणि देवालाच अर्पण करायचे, असा त्यांचा भाव असायचा. 
- श्री. सुरेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.११.२०१६) 
३ आ. साधकांना काकांच्या घरी गेल्यावर स्वतःच्या घरी असल्याप्रमाणे वाटणे : काका कुडाळ येथे घरी असतांना त्यांना देवद आश्रमातील साधक कुडाळ येथील सनातन सेवाकेंद्रात आले आहेत, असे समजले, तर ते त्यांना घरी अल्पाहार आणि भोजन करण्यासाठी बोलवत. साधकांनी सिंधुदुर्ग जिल्हा पाहिला नसल्यास काका त्यांना काही ठिकाणी फिरवून आणत. त्यामुळे साधकांना काकांच्या घरी गेल्यावर स्वत:च्याच घरीम असल्यासारखे वाटत असे.
३ इ. वेळप्रसंगी काकांनी त्यांच्या आस्थापनाचे वाहन साधकांना गावी येण्या-जाण्यासाठी उपलब्ध करून देणे : आमचे गाव काकांच्या घरापासून काही अंतरावर असल्यामुळे कधी गावी जावे लागल्यास प्रथम आम्ही काकांच्या घरीच जायचो. त्यांच्या कुटुंबियांसमवेत आमचे ऋणानुबंध निर्माण झाले होते. वेळप्रसंगी आमचे सर्व कुटुंबीय सिंधुदुर्गात आले, तर बसगाड्यांच्या अडचणींमुळे काका त्यांच्या आस्थापनाचे वाहनही उपलब्ध करून द्यायचे. पनवेल येथे परततांना ते डब्याची व्यवस्थाही करायचे. 
- सर्वश्री सुरेश आणि यज्ञेश सावंत, तसेच सर्व साधक, सनातन सेवाकेंद्र, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. 
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव 
अ. काकांना व्यवसायात घ्यावे लागलेले पुष्कळ कर्ज फिटले. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच ते फिटले, असा त्यांचा भाव होता. त्यांना पुनर्जन्मच झाल्यासारखे वाटत असेे. 
आ. काकांची नातवंडे उच्च लोकांतून साधनेसाठी पृथ्वीवर आलेली आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच ती आल्याने साधना म्हणून त्यांचे संगोपन करायला हवे, असे काकांना वाटत असे.
इ. जावई आणि नातवंडे यांना मला केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचाच आधार आहे, असे काका सांगायचे.
ई. जे व्यवहारातील मिळाले आहे आणि मिळत आहे, ते प.पू. गुरुदेवांमुळे मिळत आहे. त्यामुळे आपण साधना वाढवली पाहिजे, असे ते सांगायचे. 
- श्री. यज्ञेश सावंत 
उ. आपण सनातनमध्ये आहोत, हे आपले भाग्य आहे. मी शरिराने विकलांग असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले माझी प्रगती करून घेणार, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. - श्री. सुरेश सावंत 
५. देसाईकाका यांचा मृत्यू झाला असला, तरी ते आमच्यासमवेतच आहेत, असेच आम्हा देवद आश्रमातील साधकांना वाटत आहे. - श्री. यज्ञेश सावंत
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn