Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गंभीर आजारपणात अखंड अनुसंधानात आणि आनंदी राहून परिस्थितीवर मात करणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दीपाली मतकर !

कु. तृप्ती गावडे
कु. दीपाली मतकर पुष्कळ आजारी असल्याचे कळल्यावर मला तिच्याजवळ रहाण्याची आणि तिला पहाण्याची तीव्र इच्छा झाली. नंतर मला सोलापूरला दीपालीच्या साहाय्यासाठी जाण्याचा निरोप मिळाला. तिची भक्ती किती श्रेष्ठ आहे, पुष्कळ शारीरिक त्रास होत असतांनाही ती देवाशी कशी एकरूप होते, हे शिकण्यासाठी देवाने मला तिथे पाठवल्याचे माझ्या लक्षात आले. रुग्णालयात गेल्यानंतर देवाने तिला केलेले साहाय्य, दीपालीसमवेत असतांना तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि प.पू. डॉक्टरांची अनुभवलेली प्रीती यांविषयी पुढे देत आहे.
९. दीपालीवर सूक्ष्मातून वाईट शक्ती आक्रमण करत असल्याचे जाणवायचे; सूक्ष्मातून देव तिथे असल्याने त्या काहीही करू शकत नसल्याचे लक्षात येणे
दीपालीला पुष्कळ वेदना व्हायच्या. त्या वेळी माझे पाय थरथरायचे आणि छातीत धडधडायचे. त्या वेळी तिच्याजवळ सूक्ष्मातून दोन वाईट शक्ती थांबल्या आहेत, असे जाणवायचे. त्या दीपालीला हात लावण्याचा आणि तिच्यावर झेप घेण्याचा प्रयत्न करीत; परंतु तिथे सूक्ष्मातून देवाचे अस्तित्व असल्याने त्यांना ते जमत नव्हते, असे मला जाणवायचे.

१०. दीपालीच्या आजाराशी सूक्ष्मातून संवाद साधून त्यांना चुकीच्या ठिकाणी आल्याची आणि प.पू. डॉक्टरांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिल्यावर आजाराने शरीर सोडत असल्याचे सांगणे अन् आधुनिक वैद्यांनी पडताळल्यावर आजार अल्प झाल्याचे जाणवणे
प.पू. डॉक्टरांच्या सूक्ष्मातील अस्तित्वामुळे मनाला धीर यायचा. तिला होणार्‍या वेदना पाहून देवाला प्रार्थना व्हायची, मला माझे आयुष्य नको आहे, तिला दे. एकदा मी तिच्या देहातील आजारांशी बोलले. त्या वेळी आजारही माझ्याशी बोलत असल्याचे जाणवले. त्या वेळी झालेले संभाषण पुढे देत आहे.

मी : तुम्ही तिच्या देहात का शिरलात ?
आजार : देहात शिरावेसे वाटले; म्हणून आम्ही प्रवेश केला.
मी : तुम्ही चुकीची जागा निवडलीत. तिचे गुरु कोण आहेत, ते तुम्हाला माहीत आहे का ?

त्यानंतर मी प.पू. डॉक्टरांचे नाव घेताच त्या आजारांनी तिच्या देहात आता थांबणार नाही, असे सांगितले. दुसर्‍या दिवशी आधुनिक वैद्यांनी तिची पडताळणी केल्यावर आजारांचे प्रमाण अल्प होत असल्याचे सांगितले. त्यामुळे मनाला धीर आला.

११. प.पू. डॉक्टर सूक्ष्मातून सतत दीपालीजवळ उभे असल्याचे आणि दीपाली सतत सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांना पहात असल्याचे जाणवणे

भक्ताचा (दीपालीचा) प्राण वाचवण्यासाठी प.पू. डॉक्टर सूक्ष्मातून सतत तिच्याजवळ उभे आहेत आणि तिच्याभोवती कवच निर्माण करून रक्षण करत आहेत, असे मला त्या वेळी जाणवत होते. त्या वेळी दीपाली तिच्या उजव्या खांद्यावर मान आडवी करून एकटक पहायची. ती स्थुलातून प.पू. डॉक्टरांना पहात असल्याचे वाटायचे. तिचे मन अखंड प.पू. गुरुमाऊलीशी जोडले होते. ती बघत असलेल्या दिशेला प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवायचे. तिच्याभोवती पांढरा प्रकाश आणि त्या पांढर्‍या प्रकाशाच्या बाहेर काळे मोठे आवरण जाणवायचे. असे आवरण मी सर्वसामान्य व्यक्तीचा प्राण जातो, त्या वेळी अनुभवले होते.

१२. आजारी असतांना मरणयातना होत असतांना अखंड अनुसंधानात असणे आणि आजारपणातही आनंदी राहून परिस्थितीवर मात करणे
दीपालीचे एक वैशिष्ट्य लक्षात आले, ती आजारी असतांना तिला मरणयातना होत असतांना अखंड अनुसंधानात असायची. कधी त्रास होतो; म्हणून रडली नाही. उपचार करतांना होणार्‍या वेदनांमुळेही ती कंटाळली नाही. खाण्या-पिण्याची कधीच तक्रार केली नाही. कधी स्वतःहून साहाय्य मागितले नाही. तिचा तोंडवळा नेहमी आनंदी असायचा. रुग्णालयातील इतर लोकांनाही तिचे वेगळेपण लक्षात आले. ती मोठ्या आजारातून ईश्‍वरावर श्रद्धा ठेवून बाहेर पडली.

१३. दीपालीपेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या इतर रुग्णांनी रडून होत असलेल्या वेदना व्यक्त करणे आणि दीपालीने वेदनांमुळे न रडणे अन् कुणालाही त्याविषयी न सांगणे
दीपाली रुग्णालयात असतांना तिचा जो हात सुजला होता आणि त्याला जखमही झाली होती, त्या हातातूनच रक्त काढावे लागल्याने तिला इंजेक्शन टोचतांनाही पुष्कळ वेदना व्हायच्या; पण ती कधी रडली नाही किंवा तिने तसे कधी कुणाला सांगितलेही नाही, याउलट तिच्यापेक्षा वयाने मोठे असलेले इतर रुग्ण रडून वेदनांविषयी बोलायचे. तिला इंजेक्शनची सुई टोचतांना माझ्या मनाला वेदना व्हायच्या.

१४. सर्वसामान्य व्यक्तीने आजारपणातून बाहेर आल्यावर झालेल्या त्रासांविषयी भावना व्यक्त करणे आणि दीपालीला आपल्यामुळे साधकांचा वेळ जात असल्याची रूखरूख लागणे

सर्वसामान्य व्यक्ती आजारपणातून बाहेर आल्यावर झालेल्या त्रासांविषयी बोलतात किंवा घरातील नातेवाईक भेटायला आल्यावर त्यांच्या डोळ्यांतून पाणी येते. दीपालीच्या मनात माझ्यामुळे सगळ्यांचा वेळ जातो. सगळ्यांच्या सेवा थांबल्या आहेत, अशी रूखरूख असायची. ती भूतकाळातील विचार सोडून लगेच वर्तमानस्थितीत येऊन पुन्हा गुरुसेवेचा आनंद घेत होती.

१५. उपायांसाठी गणपतीजवळील फूल दिल्यावर दीपालीने ते गणपतीने दिल्याचे ओळखणे
रुग्णालयाची ग्रामदेवता, स्थानदेवता दीपालीचे रक्षण करत आहे, असे मला जाणवत होते. तसेच रुण्गालयाच्या आवारात उजव्या सोंडेच्या श्री गणेशाचे मंदिर आहे. त्याला मी प्रतिदिन प्रार्थना करीत होते आणि दीपालीच्या स्थितीचा आढावाही देत होते. एक दिवस मी गणपतीजवळचे फूल दीपालीसाठी घेऊन गेले आणि तिला विचारले, कुणी दिले आहे, ते ओळख पाहू ? त्या वेळी तिने गणपतीने दिल्याचे ओळखले आणि तिला आनंदही झाला. निघतांना तिने गणपतीचे दर्शन घेतले. त्या वेळी तिला आणि गणपतीला पुष्कळ आनंद झाल्याचे मला जाणवले.

१६. रामनाथी आश्रमात आल्यावर प.पू. डॉक्टरांची भेट होणे आणि माझा प्राण जायला यायचा, असे दीपालीने सांगताच म्हणून तर मी तिकडे यायचो, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
रामनाथी आश्रमात आल्यावर प.पू. डॉक्टरांना भेटल्यावर दीपाली म्हणाली, प.पू. डॉक्टर, माझा प्राण जायला यायचा. त्या वेळी लगेच प.पू. डॉक्टर म्हणाले, म्हणूनच मी सूक्ष्मातून तिकडे यायचो. त्या वेळी कितीही कठोर प्रारब्ध असेल, तर गुरु साहाय्य करतात आणि त्यातून बाहेर काढून आपले रक्षण करतात. गुरु आपल्या भक्ताची अखंड सेवा करत असतात, हे लक्षात आले.

१७. भक्ताला आयुष्य देणारे आणि प्रारब्ध संपवून मोक्षाला घेऊन जाणारेही प.पू. डॉक्टर असल्याचे साधिकेने अनुभवणे
एकदा आपण गुरूंचे झालो की, आपल्या जीवनातील कठोर प्रारब्ध, त्रास, कष्ट, भोग या सगळ्यांतून, तसेच केवळ मृत्यूच्या वेळी नव्हे, तर मृत्यूनंतरही काळजी घेणारे केवळ प.पू. डॉक्टर आहेत. प.पू. डॉक्टर तिला म्हणाले, तुला इतका त्रास होत होता, तेव्हा मी देवाला म्हटले, माझे आयुष्य दीपालीला दे; पण माझ्या लक्षात आले की, माझे आयुष्य २ ते ३ वर्षेच आहे. तुला पुष्कळ आयुष्य द्यायला हवे. त्यावर दीपाली म्हणाली, देवाला कुठे आयुष्य असते ? लगेच प.पू. डॉक्टर म्हणाले, देहाला आयुष्य असते ना ? यावरून लक्षात आले की, भक्ताला आयुष्य देणारेही तेच (प.पू. डॉक्टर) आहेत आणि प्रारब्ध संपवून मोक्षाला घेऊन जाणारेही तेच आहेत.

१८. अनुभूती
१८ अ. प.पू. पांडे महाराज यांनी दीपालीला तुळशीचे पान खाण्यास सांगणे आणि बाहेर गेल्यावर तुळशीचे रोप दिसल्यावर त्याची पाने दीपालीला खाण्यास देऊया, असा विचार मनात येणे अन् ते तिला खाण्यास दिल्यानंतर प्रतिदिन तुळशीचे पान खाण्यास देण्याचा निरोप मिळणे : दीपाली रुग्णालयात असतांना प.पू. पांडे महाराज यांनी तिला एक दिवस तुळशीचे पान खायला सांगितले होते. त्या वेळी हा उपाय नियमित करायचा आहे, असा निरोप नव्हता. त्यानंतर मी त्या दिवशी रुग्णालयाच्या आवारातून काही साहित्य आणण्यासाठी बाहेर जात होते. तेव्हा तिकडे जातांना मला एक तुळशीची कुंडी दिसली. तेव्हा मनात विचार आला, दीपालीला तुळशीचे पान खायला देऊया. तिलाही तुळशीची पाने पाहून फार आनंद झाला. संध्याकाळी प.पू. पांडे महाराज यांचा निरोप आला, दीपालीला प्रतिदिन तुळशीची पाने खायला देत जा. तेव्हा लक्षात आले, देवच तिच्यावर तुळशीच्या माध्यमातून उपाय करत आहे आणि वरील प्रसंग देवानेच घडवला.

१८ आ. रुग्णालयात पुष्कळ दाब जाणवत असतांना देवाने जागा पालटून तिचे रक्षण करणे : अमावस्येच्या दिवशी रुग्णालयात पुष्कळ दाब जाणवत होता. त्या दिवशी अतिदक्षता कक्षात दीपालीच्या शेजारी असलेल्या आणि इतर काही रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे भीती वाटली. त्या दिवशी दीपालीला दुसर्‍या जागेवर हलवून देवाने तिचे रक्षण केल्याचे जाणवले. त्यामुळे पुष्कळ कृतज्ञता वाटली.

१८ इ. सदगुरु (सौ.) बिंदाताईंना दीपालीविषयी सांगणारी देवी तिच्याजवळ असल्याचे जाणवणे : दीपालीला रुग्णालयातून सोडणार असल्याचे सदगुरु (सौ.) बिंदाताईंना कळवल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. त्या म्हणाल्या, देवीने ६.११.२०१६ पर्यंत सोडणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून प्रत्यक्ष देवी दीपालीजवळ असल्याचे लक्षात आले.

१८ ई. दीपालीला तुळजाभवानी देवीच्या चरणांवर वाहिलेल्या फुलांचा गजरा उपायांसाठी दिल्यावर तो सहा दिवस टवटवीत रहाणे : एक दिवस एका साधकाने तुळजाभवानी देवीच्या चरणांवर वाहिलेल्या फुलांचा गजरा आणून दिला. तो पाहून देवीच आल्याचे दीपालीला वाटले. ती फुले सहा दिवस टवटवीत होती. ती फुले दीपाली रुग्णालयातून रामनाथी आश्रमात यायला निघाल्यावर कोमेजली.

१८ उ. दीपालीची स्थिती सुधारल्यावर मनाची बधिरता न्यून होऊन उत्साह जाणवणे : दीपालीची सेवा करतांना मला स्वतःची काही जाणीव नसायची. माझे बोलण्याचे प्रमाण अल्प होऊन मन बधीर झाले होते. दूरध्वनी करण्यासाठी साधकांची नावे आठवत नव्हती. दीपालीची स्थिती सुधारू लागल्यावर मी बोलू लागले आणि मोकळे वाटून उत्साह जाणवू लागला.

१९. रुग्णालयातील लोकांना आम्ही दोघी बहिणी असल्याचे वाटणे, त्या वेळी देवच ते नाते जोडत असल्याचे जाणवणे

रुग्णालयातील इतर रुग्णांचे नातेवाईक किंवा परिचारिका आम्हा दोघींना विचारायचे, तुम्ही बहिणी आहात का ? आमचे एकमेकींवर पुष्कळ प्रेम आहे. त्या वेळी आम्ही बहिणीचे नाते ठेवले नाही; पण देव ते नाते समोरच्या व्यक्तींच्या माध्यमातून जोडत आहे, असे आम्हाला जाणवायचे.
 
देवा, माझे दीपालीशी मायेतील काही नाते नसले, तरी तू मला भक्तीच्या नात्याने तिच्याशी जोडून ठेवले आहेस, ही माझ्यावर तुम्ही केलेली कृपा आहे. प.पू. डॉक्टर, या कलियुगात अखंड भक्ती करणार्‍या या जिवासमवेत तू मला ठेवले आहेस. त्याची कृतज्ञता म्हणून तिच्याकडून शिकून कृतीत आणता येऊ दे, ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे. (समाप्त)
- कु. तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२३.११.२०१६)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn