Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

साधकांना अत्यंत महत्त्वाची सूचना

      तांत्रिक अडचणींमुळे सनातन संस्थेच्या अंतर्गत चालू असलेले एअरटेल आणि बीएस्एन्एल् यांचे भ्रमणभाष गट
३१ डिसेंबर २०१६ या दिवशी बंद होत आहेत. जे साधक एअरटेल आणि बीएस्एन्एल् यांच्या गट योजनेचे स्वत:हून ग्राहक बनले होते, त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत स्वत:चे भ्रमणभाष क्रमांक बंद करावेत. या क्रमांकावर व्हॉट्स अ‍ॅपची सुविधा असल्यास ती बंद करून अन्य क्रमांकावर चालू करण्याची व्यवस्था करावी.
१. पोस्टपेड एअरटेल बंद करण्याची पद्धत
      पोस्टपेड एअरटेल क्रमांक बंद करण्यासाठी साधकांनी त्यांच्या एअरटेल क्रमांकावरून एअरटेलच्या ग्राहकसेवा क्रमांक (कस्टमरकेअर नंबर) १९८ वर दूरभाष करावा. त्यानंतर दूरभाषवर सांगितल्या जाणार्‍या क्रमांकांमध्ये ९ वा क्रमांक दाबून ग्राहक प्रतिनिधीशी पोस्टपेड एअरटेल क्रमांक बंद करण्याविषयी संभाषण करावे. त्यांना ३१ डिसेंबरपूर्वी आपला क्रमांक कधी बंद करावा, हे सांगावे. त्यानुसार ते आपल्या सूचनेनुसार क्रमांक बंद करतात. तसेच आपल्याला त्या संदर्भातील लघुसंदेश पाठवतात.
२. बीएस्एन्एल् बंद करण्याची पद्धत पोस्टपेड बीएस्एन्एल् क्रमांक बंद करण्यासाठी साधकांनी त्यांनी ज्या ठिकाणच्या बीएस्एन्एल् कार्यालयातून क्रमांक घेतला आहे, तेथे जाऊन पोस्टपेड बीएस्एन्एल् क्रमांक बंद करण्याचा छापील अर्ज भरावा. त्याला बीएस्एन्एल्च्या भरलेल्या देयकाची प्रत, तसेच आधार कार्डची छायांकित प्रत जोडावी. आपण सांगितलेल्या दिनांकानुसार पोस्टपेड बीएस्एन्एल् क्रमांक बंद केला जातो. शेवटचे देयक भरतांना पूर्वी अ‍ॅडव्हान्स रक्कम भरली असल्यास ती वजा केल्याची निश्‍चिती करावी.
      जे साधक दुसर्‍या जिल्ह्यात निवास करतात, त्यांचे नातेवाईक अथवा आप्त हा छापील अर्ज साधकांच्या नावाने भरू शकतात; मात्र त्यासह आधार कार्डची छायांकित प्रत जोडणे आवश्यक असते.
३. वैयक्तिक भ्रमणभाष क्रमांक बंद करतांना ही दक्षता घ्या !
      पोस्टपेड भ्रमणभाष क्रमांक बंद करतांना साधकांनी आपले वैयक्तिक बँक खाती, आधार कार्ड, गॅस एजन्सी, इ-मेल पत्ता आदींना तो क्रमांक दिला असल्यास तो स्वतःच्या वैकल्पिक क्रमांकावर स्थलांतरित करावा. त्यासाठी आवश्यक कार्यालयांत अथवा ऑनलाईन अर्ज करावेत.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn