Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बैठका-संपर्क, सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून धर्मजागृती सभेचा व्यापक प्रसार !

गोरंबे येथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासमोर विषय मांडतांना श्री. सुनील घनवट
पतंजली योग समितीचे उपाध्यक्ष श्री. गिरीश आरेकर (उजवीकडे)
यांना निमंत्रण देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
११ डिसेंबरच्या कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने
    कोल्हापूर, ३ डिसेंबर (वार्ता.) - येथील हिंदु धर्मजागृती सभेसाठी कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रसार चालू आहे. शहरात लक्षतीर्थ सुतारमळा येथे सौ. अंजली कोटगी यांनी महिलांची बैठक घेतली. या वेळी २५ हून अधिक महिला उपस्थित होत्या. बैठकीचे नियोजन सौ. प्रतिभा गावडे यांनी केले होते. बैठकीत सौ. मंगला पाटील यांनी सभेसाठीचे ५० विशेषांक प्रायोजित केले, तर धर्मशिक्षण वर्गाची मागणीही करण्यात आली. याच समवेत शिरोली येथील श्री बिरदेव मंदिरात झालेल्या बैठकीत ५५ महिला उपस्थित होत्या, तर गंगावेश सावंतवाडा येथे झालेल्या बैठकीसाठी ३० हून अधिक महिला उपस्थित होत्या. नागोबा मंदिर, पाचगाव भैरवनाथाचे मंदिर, मंगळवार पेठ मंडलिक वसाहत, जरगनगर साईनाथ मंदिराच्या शेजारी, भक्तीपूजानगर या ठिकाणी झालेल्या बैठकीत आम्ही सभेसाठी येणार, असे सर्वांनी सांगितले. या वेळी ह.भ.प. गावडे आणि ह.भ.प. गणेश महाराज यांना निमंत्रण अन् अंक देण्यात आले.
तरुण आणि पुरुष यांच्या बैठकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद !
     सभेच्या निमित्ताने शहर आणि ग्रामीण भागात तरुण आणि पुरुष वर्गासाठी मोठ्या प्रमाणात बैठका होत आहेत. नागाव येथील बैठकीसाठी ५५ जण उपस्थित होते. येथे दोन फलकांचे (होर्डिंग्ज) नियोजन करू, असे सांगितले आणि धर्मशिक्षण वर्गाची मागणीही आली. रेंदाळ येथे झालेल्या बैठकीत तरुणांनी भगवा ध्वज घेऊन २०० हून अधिक जण उपस्थित राहू, असे सांगितले. वडकशिवाले गावात शिवमंदिरात झालेल्या बैठकीसाठी ७५ जण, तर तुरंबे या गावात झालेल्या बैठकीसाठी ५५ जणांची उपस्थिती होती. या गावातील धर्माभिमान्यांनी गावात त्वरित भित्तीपत्रके लावणे, तसेच सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रचार चालू केला. या गावात धर्मसभा घेण्याची मागणीही करण्यात आली.
सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमांतून लक्षावधी लोकांपर्यंत सभेचे निमंत्रण !
    ही हिंदु धर्मजागृती सभा ऐतिहासिक असल्याने याचा प्रसार सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातूनही वेगाने चालू आहे.
१. व्हॉटस् अ‍ॅपवर ७५ सहस्रांपेक्षा अधिक लोकांपर्यंत, फेसबूकच्या माध्यमातून २ लक्ष ७५ सहस्रांपेक्षा अधिक, तर ट्विटर वरून ५ सहस्रांपेक्षा अधिक लोकांपर्यंत सभेचा विषय पोहोचला आहे.
२. ६० गावांत झालेल्या बैठकांच्या माध्यमातून १३० हून अधिक धर्माभिमानी सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून सहस्रो लोकांपर्यंत विषय पोचवत आहेत.
३. फेसबूकच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यातील वाडी जंक्शन येथील हरीश माने या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची ओळख झाली. त्यांनी त्यांच्या मित्रांसह सभेला येणार असल्याचे सांगितले.
४. पतंजली योग समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. गिरीश आरेकर हे सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रतिदिन व्हॉटस् अ‍ॅपवर ४ सहस्रांपेक्षा अधिक लोकांपर्यंत, तर फेसबूकच्या माध्यमातून ५ सहस्र लोकांपर्यंत प्रसार करत आहेत, अनेक हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना यांचे प्रतिनिधी सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत विषय पोेचवत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn