Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राकडे वाटचाल ! - शरद माळी, श्रीशिवप्रतिष्ठान

  • हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या वाहनफेरीत ११५ हून अधिक दुचाकींचा उत्स्फूर्त सहभाग ! 
  • कोल्हापूर येथे ११ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभा ! 

वाहनफेरीत सहभागी सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ

        कोल्हापूर, ९ डिसेंबर (वार्ता.) - कोल्हापूर जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. आजूबाजूच्या अनेक गडकोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य होते. या शिवरायांच्या भूमीत काही संघटना जाणीवपूर्वक हिंदु धर्म, देश, देवता यांच्यावर टीका करत आहेत; मात्र यापुढील काळात ही टीका सहन केली जाणार नाही. ही सभा म्हणजे हिंदुत्वाची डरकाळी आहे. या सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र येणारच आहे, असे ठाम प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. शरद माळी यांनी केले. ते ११ डिसेंबर या दिवशी होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या फेरीच्या समारोप्रसंगी बोलत होते.
मनोगत व्यक्त
करतांना श्री. शरद माळी
        या फेरीचा प्रारंभ सकाळी ११ वाजता मिरजकर तिकटी (शेषशायी विष्णु मंदिर) येथे श्री संप्रदायाचे शहरप्रमुख श्री. मारुति यादव आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुधा यादव यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून करून झाला. याचे पौरोहित्य कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या ब्रह्मवृंदाने केले. यानंतर शहरातील विविध मार्गांवरून जाऊन फेरीचा समारोप मिरजकर तिकटी येथे झाला. या फेरीत ११५ हून अधिक दुचाकी आणि ५ चारचाकी वाहने सहभागी झाली होती. फेरीत हिंदुत्वनिष्ठांचा सळसळता उत्साह पहावयास मिळाला.
विशेष
१. हुपरी येथील शिवकार्य ढोलपथकाचे श्री. ओमराज उदय माळवदे हे त्यांची बुलेट दुचाकी घेऊन या फेरीत सहभागी झाले होते.
२. श्री संप्रदायाच्या साधकांनी उपस्थितांना भगव्या टोप्या दिल्या.
ठिकठिकाणी फेरीचे स्वागत !
१. राजारामपुरी ५ वी गल्ली येथे शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. रघुनाथ टिपुगडे, श्री. कमलाकर किलकिले यांनी पुढाकार घेऊन फेरीचे स्वागत केले. या वेळी सौ. मंदाकिनी शिंदे, सौ. जौजाळ, सौ. कारखानीस उपस्थित होत्या.
२. बिंदू चौक येथे शिवसेना शाखा आझाद गल्ली यांच्या वतीने फेरीचे स्वागत करण्यात आले. या वेळी सर्वश्री विराज ओतारी, प्रशांत ओतारी, अभिजित ओतारी, ऋषीकेश ओतारी, विशाल घोरपडे, सौ. साधना ओतारी, सौ. अश्‍विनी ओतारी, सौ. गीता ओतारी उपस्थित होत्या.
३. शाहुपुरी चौथी गल्ली येथे सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रासमोर साधकांकडून ध्वजाला ओवाळून, हार घालून, तसेच पुष्पवृष्टी करून फेरीचे स्वागत करण्यात आले.
४. फेरी संपल्यानंतर साधक मिरजकर तिकटी येथे आले. त्या वेळी तेथे असलेल्या झाडांची पाने साधकांवर पुष्पवृष्टी झाल्याप्रमाणे पडली.
        फेरीच्या समारोपप्रसंगी बालसाधकांनी नाटिका सादर केली. यात जिजामाता, सुभाषचंद्र बोस, शिरीष कुमार, स्वा. सावरकर यांची वेषभूषा करण्यात आली होती. या नाटिकेत राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेले आघात, धर्माचरणाचे महत्त्व, क्रांतिकारकांचा त्याग यांसह अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. या नाटिकेने उपस्थितांची मने जिंकली.
        नाटिका पाहून दोन युवतींनी भारतीय संस्कृती समजावून सांगण्याचा हा चांगला मार्ग आहे. यामुळे आपली संस्कृती काय आहे हे कळले, अशी प्रतिक्रिया दिली.
मान्यवरांची मनोगते....
हिंदूंवर होत असलेल्या आघातांच्या विरोधात 
संघटित होण्यासाठी ११ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु 
धर्मजागृती सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! 
- किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
        या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे म्हणाले, जिहादी आतंकवाद, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदुत्वनिष्ठ नेते आणि संत यांच्या हत्या, विविध माध्यमांतून होणारे देवतांचे विडंबन, मूर्तींची तोडफोड, तीर्थयात्रांना अडथळे, हिंदूंच्या सणावारी धर्माधांनी चालू केलेल्या दंगली यांसारख्या समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे. या संकटांवर मात करणे आणि हिंदु धर्म टिकवणे, यांसाठी धर्माचरण अन् हिंदूसंघटन आवश्यक आहे. या अनुषंगाने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी भाग्यनगर येथील श्रीराम युवासेनेचे अध्यक्ष तथा भाजप आमदार श्री. राजासिंह ठाकुर, मुंबई येथील हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, सनातन संस्थेच्या संत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
महिलांचे सबलीकरण होण्यासाठी त्यांनी या 
सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून 
आपल्या संघटित शक्तीचा अविष्कार दाखवावा ! 
- कु. प्रतिभा तावरे, रणरागिणी शाखा
        या वेळी मार्गदर्शन करतांना रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिभा तावरे म्हणाल्या, हिंदूंच्याच देशात हिंदु महिलांना असुरक्षित असे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा या दैदिप्यमान इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज आहे. रणरागिणी शाखेच्या माध्यमातून महिलांचे संघटन तर चालू आहेच, त्याचसमवेत महिला सबलीकरण, सशक्तीकरण ही प्रक्रियाही चालू आहे. या सभेच्या निमित्ताने मी महिलांना आवाहन करू इच्छिते की, महिलांचे सबलीकरण होण्यासाठी त्यांनी या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या संघटित शक्तीचा अविष्कार दाखवावा. या वेळी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे म्हणाले, या सभेच्या यशस्वीतेसाठी सनातन संस्थेचा सक्रिय सहभाग आहे.
फेरीत देण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घोषणा...
१. ना काझी का ना गाझी का, ये देश है शिवाजी का !
२. कौन चले रे कौन चले हिंदूंओ के शेर चले !
फेरीसाठी सहभागी हिंदुत्वनिष्ठ
        युवा सेनेचे भाऊ चौगुले, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, श्री. कमलाकर किलकिले, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. रघुनाथ टिपुगडे, श्री. दिनकर सूर्यवंशी (मामा), बजरंग दल जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, जय शिवराय तरुण मंडळाचे संस्थापक श्री. किशोर माने, श्री. ऋतुराज माने, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. संजय कुलकर्णी, शिवसेनेचे श्री. पद्माकर कापसे, स्वाध्याय परिवाराचे श्री. पुरुषोत्तम पटेल, पतंजली योग समितीचे श्री. संजय पाटील, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. विजय गुळवे, मत्तीवडे या गावातील हिंदुत्वनिष्ठ नवनाथ पाटील आणि अर्जुन केसरकर, तसेच हणबरवाडी या गावातील श्री. गणेश ढेंगे आणि श्री. सरदार व्हन्नाळे या वेळी सनातन संस्थेच्या प्रसारसेविका सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडे उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn