Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबईत आयएन्एस् बेतवा युद्धनौकेला झालेल्या अपघातात दोन नौसैनिक बेपत्ता

युद्धनौकांचे शांतताकाळात अपघात होणे चिंताजनक !
      मुंबई - मुंबईतील नौदलाच्या गोदीमध्ये डागडुजीसाठी आलेल्या आयएन्एस् बेतवा या युद्धनौकेला समुद्रात सोडतांना टेकूवरून घसरल्याने अपघात झाला आहे. या अपघातात १४ नौसैनिकांची सुटका करण्यात आली असून अद्याप दोन नौसैनिक बेपत्ता झाले आहेत.       मुंबईतील नौसेनेच्या गोदीत या युद्धनौकेची डागडुजी चालू होती. सोमवारी दुपारी या युद्धनौकेला पुन्हा समुद्रात सोडतांना युद्धनौका टेकूवरून घसरली. या अपघातात १६ नौसैनिक अडकले होते. यातील १४ जणांची सुटका करण्यात यश आले. तर उर्वरित दोघे जण बेपत्ता असल्याचे नौदलाने स्पष्ट केले. तांत्रिक त्रुटींमुळे हा अपघात झाला असून या घटनेची सविस्तर माहिती घेत असल्याचे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले. आयएन्एस् बेतवा या युद्धनौकेचे वजन ३८०० टन असून २००४ मध्ये ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. या युद्धनौकेत अत्याधुनिक तंत्रज्ञान असून जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
      नौदल गोदीमध्ये क्रूझर ग्रेव्हिंग गोदीत ही युद्धनौका कलंडल्याचे समजते. अपघातात युद्धनौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र नौदलाने याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
१२५ मीटर लांब ही युद्धनौका ३० सागरी मैल प्रति तास या वेगाने प्रवास करू शकते आणि मिसाईल हल्लारोधक यंत्रणाही या युद्धनौकेत आहेत.
      आयएन्एस् बेतवा ही युद्धनौका भारतीय बनावटीची युद्धनौका आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn