Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देशभक्तीचे अज्ञानी !

संपादकीय
      दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे देशातील सर्व चित्रपटगृहांत चित्रपट चालू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणे सक्तीचे केले. देशवासियांमध्ये देशभक्ती जागृत करणे, हाच त्यामागील उदात्त हेतू आहे; मात्र एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना त्याविषयी खात्री वाटत नाही. ते प्रश्‍न विचारत आहेत, चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवल्याने देशभक्ती जागृत होणार आहे का ? देशाची विद्यमान स्थिती अशी आहे की, जनतेने एकसंध रहाणे आणि देशाविषयी प्रेम आणि आत्मियता दाखवणे आवश्यक झाले आहे. लोकनियुक्त शासन लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने सदासर्वकाळ यशस्वी होण्याची शक्यता नाही. अशा वेळी जनतेनेच शासनाच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे. नुकतेच केंद्रशासनाने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या विरोधात भाजपच्या सर्व विरोधकांनी रान उठवले. काळा पैसा नष्ट झालाच पाहिजे; पण विरोधकांना विश्‍वासात न घेता असा महत्त्वाचा निर्णय घेणे योग्य नाही, असा त्या सर्वांचा सूर होता. विरोधासाठी विरोध किंवा राजकारण करण्याचाच तो प्रकार होता. या नोटा चलनातून काढून घेण्यामागे जो उद्देश होता, तोच या विरोधकांना समजला नाही, असेच जनतेला म्हणावे लागले. विरोधक संसदेत गोंधळ घालत होते, त्याच वेळी सर्वसामान्य जनता म्हणत होती, आम्ही केंद्रशासनाच्या बरोबर आहोत. याचाच अर्थ निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेला पाहिजे त्या गोष्टी देतीलच, याची खात्री नाही. केंद्रशासनाच्या निर्णयाला केला जाणारा विरोध योग्य कसा आहे, हे पटवून देण्यासाठी जनतेला कसा त्रास होत आहे, याची उदाहरणे ही मंडळी देत होती. म्हणजे जनतेच्या समस्या सोडवण्याचे कार्य करण्याला जणू ऊत आला होता. चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावले असता निर्माण होणार्‍या समस्या सांगतांना ओवैसी यांनी गोव्यातील एका चित्रपटगृहातील प्रसंग सांगितला. राष्ट्रगीत चालू असतांना एक अपंग व्यक्ती उठून उभी राहिली नाही म्हणून इतरांनी तिला घृणास्पद वागणूक दिली. प्रसंग टाळता येण्यासारखा असतांना तो घडला, हे वाईटच झाले; पण राष्ट्रगीत वाजवण्यामागील उद्देश लक्षात घेऊन ते चालू असतांना होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी नियम करण्याविषयी विचारमंथन का होत नाही ? त्याऐवजी राष्ट्रगीतच नको, अशी मानसिकता जोपासणे खासदारकीच्या व्यक्तीला शोभते का ? जनतेमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे आणि त्याची जोपासना करणे हे लोकप्रतिनिधीचे कतर्र्र्र्व्य नाही का ? राष्ट्रगीत वाजवून देशभक्ती निर्माण होणार नाही, असे म्हणणे हा आपल्याच राष्ट्रगीताचा अपमान असून देशभक्ती या शब्दाची खिल्ली उडवण्यासारखे होते. असे लोक लोकप्रतिनिधी होतात, हे भारतीय लोकराज्याचे दुर्दैव आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn