Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अखंड भारत मोर्चाचे संस्थापक आणि माजी खासदार श्री. वैकुंठलाल शर्मा उपाख्य प्रेमसिंह शेर (वय ८७ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. संदीप आहुजा, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे,
श्री. वैकुंठलाल शर्मा आणि दीपक सिंह
      देहली - अखंड भारत मोर्चाचे संस्थापक, तसेच देहलीचे माजी खासदार श्री. वैकुंठलाल शर्मा उपाख्य प्रेमसिंह शेर यांचा १७ डिसेंबरला ८८ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच अखंड भारत मोर्चाचा १८ वा स्थापना दिवसही साजरा करण्यात आला. येथील लक्ष्मीनगरमधील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हा वाढदिवस साजरा करतांना त्यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. या वेळी उपस्थित असणारे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांची पातळी घोषित केली. पू. डॉ. पिंगळे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी प्रेमसिंह शेर यांचे हितचिंतक, तसेच अखंड भारत मोर्चाचे सर्वश्री संदीप आहुजा, दीपक सिंह, भारतभूषण, भारत बत्रा, प्रवेश आणि अन्य पदाधिकारी, तसेच सनातनच्या साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर उपस्थित होत्या.
हिंदुत्वसाठी परत परत माझा जन्म व्हावा ! - श्री. प्रेमसिंह शेर
     या वेळी श्री. प्रेमसिंह शेर म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले हे भारतातील काही मोजक्या महापुरुषांपैकी एक आहेत. त्यांचे शेकडो पूर्णवेळ साधक आहेत. ते घरदार सोडून हिंदुत्वाचे कार्य करत आहेत. असे भारतात क्वचित् दिसते. प.पू. डॉ आठवले यांनी सांगितले की, ‘मी जीवनमुक्त झालो आहे.’ मी जीवनमुक्त होणार’, असे माझ्या कुंडलीतच लिहिले आहे. माझी कुंडली वर्ष १९२९ मध्ये माझ्या काकांनी बनवली होती. गोवा कुठे आणि माझे गाव कुठे, तरी प.पू. डॉ. आठवले यांनी ही भविष्यवाणी केली. मी जीवनमुक्त झालो, तरी माझा जन्म परत परत व्हावा आणि माझे जीवन हिंदुत्वासाठीच पूर्णपणे समर्पित व्हावे, अशीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !’’
श्री. वैकुंठलाल शर्मा उपाख्य प्रेमसिंह शेर यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये
१. प्रखर देशभक्त
    ‘श्री. वैकुंठलाल शर्मा उपाख्य प्रेमसिंह शेर यांचे वय ८७ वर्षे आहे. या वयातही त्यांची वाणी खणखणीत आहे. ते प्रखर देशभक्तीने प्रेरणा देणारे भाषण करतात. त्यांना देशाच्या सद्यःस्थितीविषयी चिंता आहे आणि अन्यायाविषयी चीडही आहे. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. कालच्या भेटीत त्यांनी वर्ष १९४६ मध्ये त्यांनी रचलेले गीत ऐकवले. हे गीत अतिशय प्रेरणा देणारे आणि उत्साह वाढवणारे आहे.
२. तत्त्वनिष्ठ
      ते स्वतः खासदार होते; पण त्यांनी कधीही अवैध मार्गाने धन मिळवले नाही. त्यामुळे त्यांचे राहणीमानही अतिशय साधे आहे. नोटाबंदीमुळे त्यांची पत्नी आणि मुलगी यांना अधिकोषात फेर्‍या माराव्या लागतात; पण प्रेमसिंह हे माजी खासदार असल्याचा अपलाभ घेऊन त्यांना साहाय्य करत नाहीत.
२ अ. कारसेवकांच्या विश्‍वासास पात्र
      अयोध्येत बाबरी मशिदीवर कारसेवकांनी केलेल्या कारवाईच्या वेळी श्री. प्रेमसिंह तेथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. कारसेवकांनी आणलेली श्रीरामाची मूर्ती तेथे असलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या हातात देण्याऐवजी त्यांनी ती श्री. प्रेमसिंह यांच्या हातात दिली; कारण कारसेवकांचा प्रेमसिंह यांच्यावर अधिक विश्‍वास होता.
३. सनातन संस्था आणि साधक यांच्याविषयीचा प्रेमभाव
      त्यांना भेटल्यावर ते सर्वप्रथम सनातन संस्था आणि साधक यांची विचारपूस करतात. ते विचारतात, ‘‘साधकांना काही अडचण नाही ना ? पोलीस साधकांना त्रास देत नाहीत ना ?’’ साधक त्यांच्या घरी गेल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होतो.
४. अहं अल्प असणे
      एवढे अनुभवी आणि कर्तव्यनिष्ठ असूनही त्यांच्या बोलण्यातून ‘मी किती केले आहे किंवा मला पुष्कळ माहिती आहे’, अशा प्रकारचा अहं किंचितही जाणवत नाही. बोलतांना ते अनेक वेळा म्हणतात, ‘‘देवाला माझ्याकडून जे करवून घ्यायचे होते, ते त्याने करवून घेतले.’’
- सौ. क्षिप्रा जुवेकर, देहली (१४.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn