Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राष्ट्र आणि विश्‍व यांचे कल्याण होण्यासाठी सनातन धर्म अन् संस्कृती यांनुसार आचरण आणि समर्पणाची भावना असेल, तेव्हाच राष्ट्राचा उत्कर्ष होऊन विश्‍वाचेही कल्याण होईल !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे अमूल्य विचारधन !
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या आज
 असलेल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...
१. धर्मज्वलंत भारत देशात धर्मनिरपेक्षतेनेे गोंधळ माजवणे, हे दुर्भाग्य ! : ‘या बेधुंद अशा धर्मनिरपेक्षतेनेे धिंगाणा घातला आहे. पावलोपावली सुरूंग पेरला आहे. त्यामुळे सनातन धर्माची प्रतिष्ठा असलेल्या या भारतखंडात दुर्भाग्याने आज कोणत्याही चांगल्या उपक्रमास जिवाभावाची माणसे मिळत नाहीत. या भारताचे दुर्दैव असे की, सैन्यदलातही हव्या त्या क्षमतेची माणसे आज नाहीत. लक्षावधी वर्षांपासून विश्‍वाची प्रतिष्ठा असलेल्या धर्मज्वलंत भारत देशात असे का घडावे ?
२. सनातन हिंदु संस्कृतीच्या चिरंतन तत्त्वांच्या आधाराविना समृद्ध जीवन जगणे अशक्य : आजचे गोंधळलेले, भांबावलेले आणि दिशाहीन जगही चिरंतन तत्त्वांचा आधार घेऊनच त्याला अनुसरणारी शास्त्रशुद्ध अशी आखणी प्रतिपादन करणार्‍या सनातन विचारसरणीच्या शोधात आहे. त्यांना या सनातन हिंदु संस्कृतीच्या चिरंतन तत्त्वांच्या आधाराविना समृद्ध जीवन जगताच यायचे नाही.
३. श्रुति, स्मृति, पुराणादी शास्त्र यांत चिरंतन मूल्ये सांगितलेली असणे : जगातले सगळेच विचारवंत आणि चिरंतन तत्त्वे मूल्यांचा पाठपुरावा करायला सांगतात. चिरंतन मूल्यांचा ध्यासच घ्यायचा असेल, तर आमची श्रुति, स्मृति, पुराणादी शास्त्रे, आमच्या परंपरा, आमच्या निष्ठा यांचा मूलभूत विचार आणि त्याला अनुरूप अशा शक्तीनुसार अनुष्ठान हे आवश्यक आहे.
     अशा काळात सनातन धर्म आणि संस्कृती यांचा उद्घोष करून अभ्युदय अन् निःश्रेयस यांच्या प्राप्तीकरता, तळहाती शिर घेऊन वीर व्रत अनुसरणारे लोक उभे रहातील,त्याच दिवशी या राष्ट्राचा उत्कर्ष होईल आणि विश्‍वाचेही कल्याण होईल !’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : ‘मासिक घनगर्जित’, ऑगस्ट २०१६)
सनातन मूल्ये अंगी बाणवण्याची आवश्यकता असण्यामागील कारणे 
    ‘सनातन मूल्यांचा विसर पडल्यामुळेच व्यसनाधीनता, भ्रष्टाचार, आत्मकेंद्री वृत्ती, प्रसिद्धीची प्रचंड हाव, धनपरायणता आणि शुष्कवाद असे अनंत दुर्गुण उसळ्या मारत आहेत.’
धर्मवृक्षाची व्यापकता !
     ‘शाखा-उपशाखांनी विस्तारलेल्या या धर्मवृक्षाचा विस्तार भाषांतरकारांनी दर्शवलेल्या अर्थापेक्षा किती विस्तृत आणि प्रचंड आहे’, हे जगासमोर स्पष्टपणे यायला हवे. हीच आमची भूमिका !’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : ‘मासिक घनगर्जित’, ऑगस्ट २०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn