Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातनच्या संत पू. शालिनी नेनेआजींचा सत्संग म्हणजे प.पू. डॉक्टरांकडून मिळालेली विजयादशमीची अमूल्य भेट !

पू. शालिनी नेनेआजी
      वर्ष २०१६ च्या विजयादशमीच्या दिवशी मला देवद आश्रमात सनातनच्या ३६ व्या संत पू. शालिनी नेनेआजींची सेवा करण्याची संधी मिळाली. पू. नेनेआजींच्या सेवेला जातांनाच मी गुरुदेवांना तुम्हाला अपेक्षित अशी सेवा होऊ दे, अशी प्रार्थना केली होती. पू. आजी भूतकाळातील आठवणींना उजाळा देत प.पू. डॉक्टरांविषयी बोलत होत्या. त्यांनी पुढील सूत्रे सांगितली.
१. प.पू. डॉक्टरांविषयी
१ अ. प.पू. डॉक्टर आणि त्यांचे ४ भाऊ म्हणजे पाच पांडवच ! : प.पू. डॉक्टर आमचे नातेवाईक आहेत. आम्ही दोघे पती-पत्नी पूर्वी त्यांच्या घरी जात होतो. तेव्हा त्यांचे लहान घर (१० फूट लांब आणि १० फूट रूंद अशा दोन खोल्या) होते. प.पू. डॉक्टर आणि त्यांचे ४ भाऊ म्हणजे पाच पांडवच आहेत. प.पू. डॉक्टरांच्या आईला आम्ही वहिनी म्हणायचो.
१ आ. प.पू. डॉक्टरांचे मन लहानपणापासूनच एकाग्र असणे : घरी आम्ही कुटुंबात बोलत असतांना प.पू. डॉक्टरांचे वाचन किंवा काहीतरी चालू असायचे. आमच्या बोलण्याच्या आवाजाने त्यांना त्रास होईल, असे म्हटले, तर वहिनी सांगायची, त्यांचे लहानपणापासूनच मन एकाग्र असते. 
१ इ. पू. नेनेआजी संत झाल्याचा प.पू. डॉक्टरांना पुष्कळ आनंद होणे : प.पू. डॉक्टर सांगतात, तसे साधनेचे प्रयत्न करते. मी त्यांना विचारले, मी संत झाले, हे तुम्हाला कसे कळले ? त्यावर ते केवळ हसले. ते पुढे म्हणाले, तुम्ही संत झालात, याचा मला पुष्कळ आनंद झाला. सन्मानाच्या वेळी मला जे छायाचित्र हवे होते, तेच मला मिळाले. 
१ ई. प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे : प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे मला देवद आश्रमात यायला मिळाले; म्हणून मी सतत कृतज्ञता व्यक्त करते. सर्वजण मला म्हणतात, तुम्ही ९३ वर्षांच्या आहात. या वयात स्नानादी सर्व कृती तुमच्या तुम्ही करता ! खरे तर तेच (प.पू. डॉक्टरच) माझ्याकडून सर्व करवून घेतात. 
२. प.पू. पांडे महाराजांनी विचारलेला प्रश्‍न आणि त्याचे पू. आजींनी दिलेले उत्तर
      एकदा प.पू. पांडे महाराजांनी पू. आजींना प्रश्‍न विचारला, आकाश म्हणजे काय ? पू. आजी म्हणाल्या, पोकळी ! 
       प.पू. डॉक्टर, आपल्या कृपेने विजयादशमीच्या दिवशी मिळालेल्या सत्संगासाठी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.
- सौ. संगीता लोटलीकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१०.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn