Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करा ! - शिक्षणमंत्र्यांना निवेदन

श्री. विनोद तावडे यांना निवेदन देतांना
आमदार श्री. राजेश क्षीरसागर (उजवीकडे)
नागपूर, १७ डिसेंबर (वार्ता.) - मुंबईतील पश्‍चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील ‘एलफिन्सटन’ रेल्वे स्थानकाचे ‘प्रभादेवी’ असे नामकरण होणार आहे, तसेच ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ (CST) रेल्वेस्थानकाच्या नावात ‘महाराज’ हे आदरार्थी संबोधन समाविष्ट करून ते ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT), तसेच ‘छत्रपती शिवाजी आंतररष्ट्रीय विमानतळ’ आता ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी १७ डिसेंबर या दिवशी शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांना दिले. 
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर येथील विद्यापिठाचे नाव ‘शिवाजी विद्यापीठ’ असे असून त्यात छत्रपतींचा उल्लेख काहीसा एकेरी आणि आदरार्थी संबोधन नसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि पराक्रम यांचे स्मरण आदराने करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचा उल्लेख योग्य उपाधी आणि संबोधन यांसह ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ होणे अत्यावश्यक आहे.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn