Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात साधिका कु. नंदा सदानंद नाईक यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
१. इतरांचे बोलणे ऐकू न येणे; मात्र प.पू. डॉक्टर 
आणि काही चांगले साधक बोलतांना ते ऐकू येणे 
     मी डिसेंबर १९९९ पासून आश्रमात सेवा करते. मी काही कारणाने प्रसारातून आश्रमात आले होते. तेव्हा माझे बाबा (पू. बाबा नाईक) आश्रमात होते. प.पू. डॉक्टरांंच्या कृपेमुळे मला आश्रमात रहायला मिळाले. त्या वेळी मला ऐकू येत नसे आणि त्यामुळे काही जण काय बोलतात ते कळत नसे. त्या वेळी प.पू. डॉक्टर जेवायला आल्यावर मी त्यांच्याशी बोलायचे. तेव्हा ते जे काही बोलायचे, ते मला ऐकू यायचे. काही चांगले साधक बोलतांनाही ऐकू यायचे; पण इतर साधकांचे बोलणे मला ऐकू यायचे नाही. तेव्हा मला पुष्कळ मानसिक त्रासही
व्हायचा. तेव्हा प.पू. डॉक्टरांशी बोलल्यावर माझे मन हलके व्हायचे. त्या वेळी ते अशी गोष्ट सांगायचे की, मला हसू यायचे. जवळजवळ २ वर्षे मला होणारा तीव्र त्रास त्यांचे बोलणे आणि अस्तित्व यांमुळे जास्त जाणवायचा नाही.
कु. नंदा नाईक
२. प.पू. डॉक्टरांनी त्रास असलेल्या साधकांची विचारपूस करणे, 
तेव्हा आमच्यामध्ये प्रेमभाव वाढावा, असा त्यांचा उद्देश लक्षात येणे 
    आश्रमात आल्यावर माझा त्रास पुष्कळ वाढला. तेव्हा ते माझ्याकडे इतर साधकांची आणि मला बरे नसल्यास त्यांच्याकडे माझी विचारपूस करत. त्या वेळी आमच्यामध्ये प्रेमभाव वाढावा, असा त्यांचा उद्देश लक्षात आला.
३. अन्य साधकांचे उदाहरण देऊन साधिकेतील 
अहंभाव आणि दोष अल्प करतात, असे वाटणे 
     मी त्यांना कधी भेटले, तर ते अशा साधकांचे उदाहरण द्यायचे की, त्यातून मला पुष्कळ शिकायला मिळायचे. त्यातून ते माझा अहंभाव आणि दोष अल्प करतात, असे वाटायचे. ते मला ज्या साधकाचे उदाहरण सांगायचे, ते ऐकून माझा अहं उफाळून येत असे. त्यानंतर त्यांचे माझा प्रत्येक दोष आणि अहं यांवर किती लक्ष आहे आणि तेच साहाय्य करतात, हे लक्षात यायचे.
४. विविध शारीरिक व्याधी आणि 
प.पू. डॉक्टरांच्या कृपेने त्यातून झालेली मुक्तता !
४ अ. प.पू. डॉक्टरांनी विचारपूस केल्यावर १५ दिवस होणारा पाठदुखीचा त्रास अल्प होणे : मला पाठदुखीचा पुष्कळ त्रास होत असे. पाठीत कोणीतरी ठोकळे मारल्यासारखे दुखायचे. काही वेळा त्रास असह्य होत असे. तेव्हा प.पू. डॉक्टर मला भेटायचे आणि माझी त्या त्रासातून मुक्तता व्हायची. अशी अनुभूती अनेकदा घेतली आहे. 
      एकदा माझा हा त्रास पुन्हा चालू झाला. दोन सप्ताह झाले, तरी तो अल्प होत नव्हता. तेव्हा स्वयंपाकघरातून कण्या धुऊन द्यायला सांगितले. तेव्हा धान्य निवडण्यासाठी मी आणि सौ. श्रावणी परब होतो. मला काही जमत नव्हते; म्हणून मी प्रार्थना केली, ईश्‍वराने मला या सेवेसाठी शक्ती द्यावी. मी कण्या धुवायला घेतल्या. आम्ही कण्या वाळत घालत होतो. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी कशी आहेस ?, असे विचारले. मी काहीच उत्तर देऊ शकले नाही. नंतर लक्षात आले की, माझा पाठीचा त्रास अल्प झाला आहे.
४ आ. ६ वर्षे खोकल्याचा त्रास होणे, हा त्रास मासातून १५ दिवस तरी असणे, नंतर प.पू. डॉक्टरांच्या कृपेने तो पूर्णपणे जाणे : मला जवळजवळ ६ वर्षे खोकल्याचा त्रास होत होता. हा त्रास मासातून (महिन्यातून) १५ दिवस तरी असायचा. वर्ष २००९ मध्ये माझा खोकला पुष्कळ वाढला. बरेच जण म्हणायचे की, एवढा खोकला आहे, तर तुला काहीतरी आजार झालेला असेल. माझी आतेबहीण आधुनिक वैद्या आहे. ती म्हणाली, एवढी वर्षे खोकला आहे, तर दुसर्‍या टप्प्याचा क्षयरोग (टीबी) होऊ शकतो; पण प.पू. डॉक्टरांच्या कृपेने उपचारानंतर माझा खोकल्याचा त्रास कायमचा गेला. 
४ इ. आकडीचा त्रास मोठा असूनही ती १० वर्षांनी आता पूर्ण आटोक्यात येणे : मला रात्री झोप येत नसे. पुष्कळ अशक्तपणाही होता. त्यातच मला आकडीचा त्रास चालू झाला. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले की, तुझी स्थिती बघितली, तर तुला मोठी आकडी झाल्यासारखे वाटत होते; पण हा त्रासही पहिल्या टप्प्याचाच असल्यामुळे लवकर बरी होशील. आता १० वर्षांनी आकडी पूर्ण आटोक्यात आली आहे. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच हे सर्व शक्य झाले.
४ ई. स्वप्नात प.पू. डॉक्टरांच्या खोलीत खाली बसल्याने गुडघेदुखीचा त्रास अल्प होणे : मला गुडघेदुखीचा त्रास होतो. मी आसंदीवर जास्त वेळ बसू शकत नव्हते. एकदा माझ्या स्वप्नात प.पू. डॉक्टरांच्या खोलीत गेल्यावर मी त्यांना सांगितले की, मी खालीच बसते. तेव्हापासून माझा गुडघेदुखीचा त्रासही अल्प झाला. 
४ उ. घरी असतांना त्रास पुष्कळ वाढणे आणि आश्रमात रहायला आल्यावर दोन मासांनी तो न्यून होणे : मागच्या वर्षी मी घरी असतांना माझे त्रास पुष्कळ वाढले. ते काही केल्या अल्प होत नव्हते. नंतर प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे मला पुन्हा आश्रमात रहायला मिळाले. इथे रहायला आल्यावर ५ दिवसांतच इतकी रुग्णाईत झाले की, मला माझे काही करता येईना. दोन मासांनी (महिन्यांनी) माझा त्रास न्यून झाला. 
५. कृतज्ञता 
      वर्ष १९९९ मध्ये मी आश्रमात आले, त्या अगोदरची आणि आताची स्थिती यांत भूमी-आकाशाचा भेद आहे. एवढी वर्षे मी आश्रमात राहिले. त्यांचे मला दैनिकातून वेळोवेळी मार्गदर्शन झाले. केवळ त्यांच्या अस्तित्वाने आणि कृपेमुळेच मी अजूनपर्यंत जिवंत अन् उभी राहू शकत आहे. त्यांच्या कृपेने आधी माझे प्रारब्ध नष्ट झाले. नंतर आता माझ्या शारीरिक सर्व व्याधी बाहेर पडत आहेत. या सर्व गोष्टींसाठी या गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती शब्दांत मांडता येत नाही. 
- कु. नंदा सदानंद नाईक, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn