Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दीपक ढवळीकर आणि सुदिन ढवळीकर यांनी गोव्याच्या राजकारणात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे स्वागत !

गोव्यात मगो पक्षाच्या दोन्ही नेत्यांना मंत्रीमंडळातून 
वगळल्याच्या प्रकरणी दैनिक सामनाचा अग्रलेख !
   दैनिक सामनाने गोवा राज्यात घडणार्‍या राजकीय घडामोडींविषयी सूचक भाष्य करणारा अग्रलेख १४ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध केला आहे. शिवसेना गोवा सुरक्षा मंचसह युती करून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरली आहे. या पार्श्‍वभूमीवर या अग्रलेखातील सूत्रांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आमच्या वाचकांसाठी त्यातील निवडक सूत्रे प्रसिद्ध करत आहोत.
मगोप मंत्र्यांच्या हकालपट्टीने राजकीय समीकरणे पालटू शकतात !
     छोेट्या गोवा राज्यात मोठी उलथापालथ झाली आहे. गोव्यातील राजकीय समीकरणे पालटू शकतात. पार्सेकर यांनी दोन मंत्र्यांना काढण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री म्हणून हा त्यांचा अधिकार असला, तरी या कारवाईमागचे खरे सूत्रधार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हेच आहेत आणि आजही गोव्याचे राजकारण देशाच्या संरक्षणमंत्र्यांना स्वत:च्याच मुठीत हवे आहे. एका बाजूला देहलीतील भाजप सरकार बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर आक्रमण करून तो भाग स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्याची भाषा करते; पण ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व धाडसाचे कार्य घडणार आहे, ते देशाचे संरक्षणमंत्री मात्र गोव्याच्या राजकारणात रमले आहेत. मगो पक्षाच्या दोन मंत्र्यांची हकालपट्टी पर्रीकर यांच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही आणि ज्याअर्थी ती झाली आहे, त्याअर्थी भाजपने आणखी एका प्रादेशिक पक्षाला वापरून फेकून देण्याची परंपरा जपली आहे. अर्थात् राजकारणात या गोष्टी नवीन नाहीत. 
मगोपला कुरतडून भाजपने स्वतःचे स्थान निर्माण केले !
      आज गोव्यात जो भाजप आहे, तो प्रारंभी मगो पक्षाशी युती वगैरे करूनच वाढला आहे. मगो हा गोव्यातील मूळचा हिंदुत्ववादी, मराठीवादी पक्ष. त्यास कुरतडून भाजपने स्वत:चे स्थान निर्माण केले; पण ज्या विचाराने गोव्यात भाजपचा प्रसार झाला, त्या विचारांचा मात्र मुडदाच पडला. आर्चबिशप यांच्या सल्ल्याने गोव्याचे राज्य चालवले जात आहे. तसे नसते, तर गोव्यातील माध्यमप्रश्‍नी पर्रीकर-पार्सेकर जोडीने कोलांटीउडी मारली नसती. इंग्रजी शाळांना अनुदान म्हणजे मराठी-कोकणी माध्यमांतील शाळांची मृत्यूघंटा ! हे ठाऊक असतांनाही पार्सेकर सरकारने इंग्रजी शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष वेलिंगकर आणि सहस्रो स्वयंसेवक यांना भाजपपासून फारकत घ्यावी लागली, हे सत्य गोव्याची जनता विसरू शकत नाही. पार्सेकर हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या गाडीचे ब्रेक आणि चक्र मनोहरपंतांच्याच हाती आहे. नोटाबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकमुळे गोव्यातील जनता भाजपच्या पाठीशी उभी राहील, असे पर्रीकर यांना वाटत आहे.
जे घडले ते चांगल्यासाठीच !
     गोव्याचे राजकारण आज सत्यधर्माचे आणि निर्मळ राहिलेले नाही. भाऊसाहेब बांदोडकर आणि शशिकलाताई काकोडकर यांच्यानंतर ते संपले. आता गोव्यातही राजकारणात पैशांचा खेळ चालला आहे. गोवा सरकारातील मंत्री आरोपीच्या पिंजर्‍यात आहेत. स्वत: ढवळीकर यांनाही अनेक आरोपांना तोंड द्यावे लागेल. आजही गोव्यातील १७-१८ मतदारसंघांत मगो पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. शिवसेनेने सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा सुरक्षा मंचाशी युती केलीच आहे. मगोपही त्यात सामील झाला, तर गोव्यातील राजकीय परिवर्तन सोपे होईल. गोव्यातील ही जी उलथापालथ झाली, जे घडले ते चांगल्यासाठीच असे मानायला हवे. दीपक आणि सुदिन ढवळीकर यांनी गोव्याच्या राजकारणात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे स्वागत करायला हवे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn