Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

यापुढे भारतियांसाठी हाँगकाँगची ‘विजा’मुक्त प्रवेश सुविधा बंद !

धूर्त चीनची भारतावर कुरघोडी ! चीनच्या दबावाखाली हाँगकाँगचा भारतविरोधी निर्णय ?
     नवी देहली - हाँगकाँगने भारतियांसाठी असलेली ‘विजा’मुक्त प्रवेश सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे हाँगकाँगला जाणार्‍या भारतियांसाठी आगमन पूर्व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात नुकतीच हाँगकाँगच्या इमिग्रेशन विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर घोषणा केली आहे. हाँगकाँगने घेतलेला हा निर्णय व्यवसाय, व्यापार आणि पर्यटनासाठी जाणार्‍या भारतियांसाठी अडचणीचा ठरणारा आहे. ही व्यवस्था २३ जानेवारी २०१७ पासून लागू करण्यात येणार आहे.      हाँगकाँग चीनचे विशेष प्रशासकीय क्षेत्र आहे. त्यामुळे चीनच्या दबावात येऊन हाँगकाँगने हे पाऊल उचलल्याचे समजले जाते. हाँगकाँगच्या विशेष प्रशासकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी भारतीय नागरिकांना ‘ऑनलाईन’ आगमन पूर्व नोंदणीसाठी आवेदन करावे लागणार आहे. जे भारतीय नागरिक थेट हवाई मार्गाने येतील आणि विमानतळाच्या बाहेर जाणार नसतील, त्यांच्यासाठी ही नोंदणी आवश्यक नाही. आतापर्यंत हाँगकाँगकडून अधिकृत ‘पासपोर्ट’ असणार्‍या भारतियांना ‘विजा’शिवाय तेथे १४ दिवस रहाण्याची मुभा होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn