Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विवाहात ख्रिस्ती वधूने साडीऐवजी गाऊन घातल्यास विवाह लावण्यास चर्चचा नकार !

धूर्त ख्रिस्ती ! आता अशिक्षित, भोळ्या; पण निष्पाप हिंदु समाजाला
फसवण्यासाठी चर्च जाणीवपूर्वक धर्मांतरित हिंदूंच्या विवाहाच्या 
प्रसंगी हिंदु वेशभूषेचा आग्रह धरतात, हे लक्षात घ्या !
    कोची - केरळ राज्यात ख्रिस्ती धर्मीय वधू विवाहाच्या वेळी पांढरी साडी नेसते. नंतर आधुनिकतेच्या नावाखाली साडीऐवजी गाऊन परिधान करण्याची पद्धत निघाली होती; मात्र चर्चच्या धार्मिक अधिकार्‍यांनी ‘गाऊन परिधान करण्याला तीव्र विरोध करून भारतीय वातावरणात आणि संस्कृतीत साडीलाच महत्त्व आहे’, असे सांगून गाऊन परिधान करून आलेल्या वधूंचे विवाह लावण्यास नकार दिल्याच्या घटना घडल्या आहेत.    केरळ राज्यातील बहुतेक चर्चमध्ये आधीपासून विवाहात वधूने साडी नेसण्याची प्रथा अस्तित्वात आहे; कारण बहुतेक ख्रिस्ती अथवा त्यांचे पूर्वज हे धर्मांतरित हिंदू असल्याने त्यांना हिंदु प्रथांविषयी अजूनही आदर आहे. ‘गाऊन हा वेश परकीय असून तो भारतात शोभून दिसत नाही’, असे अनेक ख्रिस्ती धर्मगुरूंचे मत आहे. तसेच ‘पारदर्शक गाऊन घातल्याने गळ्याजवळील भाग उघडा राहतो आणि ते अयोग्य आहे’, असे चर्चचे पाद्री म्हणाले. ‘साडी नेसणे हे मागासवर्गीय असल्याचे लक्षण नसून संस्कृतीचा आदर करण्यासारखे आहे’, असे चर्चचे मत आहे. ‘पाश्‍चात्त्यांचा प्रभाव भारतीय ख्रिस्त्यांवर पडू नये’, यासाठी चर्च प्रयत्नशील आहे असे एका उच्चपदस्थ चर्च अधिकार्‍याने सांगितले. (अलीकडे ख्रिस्ती मिशनरी भगवे कपडे घालतात, ‘स्वामी’ नावाने ओळख देतात, त्यांच्या नन साड्या, बांगड्या असा हिंदु पोशाख करतात. अशाच प्रकारे ख्रिस्त्यांकडून गाऊनला विरोध करून हिंदु पोशाखाचा आग्रह धरण्यात येत आहे, हे लक्षात घ्या ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn