Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबईत जर राम मंदिर स्थानक नाही, तर मज्जीद रेल्वेस्थानकही नाही !

गोरेगाव ते जोगेश्‍वरी रेल्वेमार्गातील नवीन 
रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवणार्‍या अबू आझमी आणि 
नवाब मलिक यांना वीर सेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांची चेतावणी ! 
       मुंबई - राम मंदिर हा नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. आम्ही अबू आझमी आणि नवाब मलिक यांना विनंती करतो की, कृपा करून आपण राम मंदिर नावाचे राजकारण करू नये. जर आपण राम मंदिर रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवला किंवा आंदोलन केले, तर वीर सेना सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने सनदशीर मार्गाने मज्जीद रेल्वेस्थानकाला विरोध करेल. मुंबईमध्ये जर राम मंदिर रेल्वेस्थानक नाही, तर मज्जीद रेल्वेस्थानक नाही, अशी चेतावणी वीर सेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांनी दिली आहे. गोरेगाव ते जोगेश्‍वरी रेल्वेमार्गातील नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर, हे नाव देण्यात यावे, यासाठी २२ ऑक्टोबर २०१५ पासून अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू करण्यात आले आहे. अखेर या नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर, असे नाव देण्यास राज्य शासनाने संमती दर्शवली असून त्याविषयीचे अधिकृत पत्र २५ नोव्हेंबर २०१६ या दिवशी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे; मात्र समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी राम मंदिर नावाला विरोध दर्शवला आहे. या पार्श्‍वभूमीवर वीर सेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांनी वरील चेतावणी दिली. 
       या वेळी श्री. निरंजन पाल म्हणाले, नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर, असे नाव देण्याची मागणी करण्यामागे कुणाच्या भावना दुखावण्याचा वीर सेनेचा हेतू नाही. हे रेल्वेस्थानक ज्या भागात आहे, त्या भागाचे नाव राम मंदिर, असे आहे. येथून एस.बी.रोड ते रेल्वेस्टेशनपर्यंतच्या रस्त्याचे नावही राम मंदिर आहे. येथील बेस्टच्या बस थांब्याचे नाव राम मंदिर आहे. येथील जनतेचे आधारकार्ड, रेशनकार्ड, वीजदेयके, दूरध्वनीचे देयक (बिल), निवडणूक ओळखपत्र या सर्वांवरील पत्त्यामध्ये या भागाचा उल्लेख राम मंदिर असाच करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन रेल्वेस्थानकाचे नाव ओशिवरा असे ठेवण्यात आले, तर येथील सर्व शासकीय कागदपत्रांवरील पत्त्यामध्येही पालट करावा लागेल. याचा जनतेला नाहक त्रास सहन करावा लागेल. नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर, असे नाव देण्याची मागणी ही केवळ वीर सेनेची मागणी नसून संपूर्ण जनतेची मागणी आहे. यासाठी या भागातील रहिवासी, सोसायटी, संस्था, राजकीय नेते, राजकीय पक्ष आदींनी स्वाक्षरी आणि पत्र यांद्वारे राम मंदिर नावाला संमती दर्शवली आहे. समाजवादी पक्षाचे अबू आझमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांना आम्हाला सांगायचे आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सचिव श्री. सचिन चव्हाण यांनी आणि समाजवादी पाटी गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष श्री. राजेंद्र सिंग (नन्हे सिंग) या आपल्या कार्यकर्त्यांनी १ वर्षापूर्वीच त्यांच्या लेटरहेडवर नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर, हे नाव देण्याला सहमती देणारे पत्र आम्हाला दिले आहे. तुमचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला वाटते की नवीन रेल्वेस्थानकाचे नाव राम मंदिर, 
असे असावे. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn