Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गुरुराया, मोक्षाचा तूच भरवी घास ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
हे गुरुराया, संकटसमयी साद घालू कुणाला ।
माता-पिता जन्म देऊनी सोडतात भवसागराला ।
बंधू-भगिनी तृप्त-अतृप्त होऊन रमतात संसारात ।
सखे-सोयरे कडेकडेनेच पहातात ।
सहकारी वरवरचे विचारतात ।
मित्र-मैत्रिणी दुःख वदने बाजूला बसतात ॥ १ ॥

देवा, किती म्हणतात, हे माझे माझे ।
विफल ठरते आता, कोण आहे माझे ।
देवा, मी किती कृतघ्न ।
हे ओळखण्यात गेले माझे जन्म ।
हे देवा, आता कळले, आता नको सोडू ही कास ।
शेवटचा मोक्षाचा तूच भरवी घास ॥ २ ॥

हे संतांनी सांगितले, परि मला नाही कळले ।
देवा, आर्ततेने करते विनवणी ।
घे या रजनीला तव चरणी ।
कृष्णकन्हैया, किती करू तुझा आता मी धावा ।
तूच ने गुरुचरणा मज ।
साद घालू तुजवीण मी कोणास ॥ ३ ॥ 

गुरुराया, लागू दे मज तुझा ध्यास ।
आणि संपव माझा तू धावा ।
देणार तू मज वेडीला ।
शंका नको मम मनाला ।
मागू मी कोणा गुरुराया ।
कारण तूच माझा माय-पिता अन् तात ॥ ४ ॥
- श्रीमती रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.५.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn